सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो.
ति रोज चोरून मह्याकडच् बघायची पर हळू हळू ध्यानात आलं, ति माह्या शेजारी बसणाऱ्या विश्याला चोरून पायची. तेव दिसला कि पोरी तिला कोपरं हानायच्या. पोटात आग आग व्हायला लागली. विश्या दिसला कि दगुड उचलायचा इच्चार मनात यायला लागला. पर इलाज नवता. तेव गाडी घीऊन येणारा वर्गात एकटाच. तेव किरकेट बी खेळायचा सारे पोरं पोरी त्याच्यावर जाम खुश. एकदा विश्यान् ग्राउंड मदी गाडी घातली अन गोल चकरा हानल्या. ति खुळ्यागत त्याच्याकडं पाह्त बसली. तव्हा डोकं खनकलं. सुन्याच्या दप्तरातून करकटक काढलं अन् लपत लपत विश्याच्या गाडीच्या दुंही टायरातून हवा काढली. वर्ग सूटल्यावर तेव गाडी ढकलत निगाला, ति पोरिहिच्या घोळक्यातून त्वांड पाडून पाहत हुती अन् म्या लपून मजा घेत हुतु. त्या दिशी लए आनंद झाला.
म्या तिच्यावर जिव ओवळायचो अन ति त्या फुगीर विश्यावर. पर दोघायचं अजुन जमलं नवतं. दोघ्ं बी एकमेकाईला नुसतं चोरून पायचे. अजुन पक्क झालं नव्हतं. पर मनी त्याहीच्ं पक्क करायच्या इराद्यात हुती, दोघायच्या मदी सारखी लुडबुडायचि. 'ति' लाजायचि पर मनी विश्यासंगट बडबड करायची, 'ति' ला विश्याच्या नावानं हाकांमारुन मोठ्यांन् खिदळायाचि. मनीचं पारगांवच्या रम्यासंग चालु हुतं. म्या मनी वर ध्यान ठीवायला चालु केलं.
एकबार शेवटचा पीरियड संपल्यावर सगळी पळाली. मनी एकटीच वर्गात थांबली. म्या चुपचाप बाजूच्या वर्गात जाउन बसलू. रम्या वर्गात घुसला, त्यानी आतून दार लावलं. मनी अन तेव दोघच् आंत. म्या हळूच भायरून कड़ी घातली. पळतच खाली आलू अन् "वरच्या मजल्यावरच्या २०१बी वर्गात पिसाळं कुत्रं शिरलय. म्या कड़ी घालून आलू. तुमि जा लवकर" असं शिपयाला सांगून टाकलं. शिपाई अजुन दोन शिपइं, मोठी काठी अन चार दोन धीट पोराइला घेऊन वर गेला. म्या पळून आलू. रातच्याला मेसवर दोन चपात्या जादा खाल्ल्या. सगलिकड़ं बोभाटा झाला. मनीचं कॉलिजात येणं बंद झालं, म्या जाम खुश. मनी हुती मनुन ति जास्तीची हिम्मत करायची, अता उलशिक निवाळ्ली.
मंग माही हिम्मत व्हाढली. एकदा तिला लेडीज हतरुमाल दिला, तिना वापस दिला. मनलं पिरेम हळू हळू हुईल्. चार दिसान् मेकपचा डबा दिला, तिना वाकडं थुबाड करुण तेव बी मागं दिला. एकदा विश्या नवा कोरा पेन पाकीटात घालून घिउन आला अन तिला गिफ्ट द्यायच्या हिंदनानं भायर थांबला. म्या दप्तरात काचाचा ताजम्हल आणलेला. वर्गात घुसून तिच्या म्हवरं ठीवला. ति चवताळली. महल घिउन मह्या मागन् आली. विश्या सुन्याबर लांब हुबा, म्या सुन्याला आवाज दिला तस्स दोघायनि माहयाकड़ं पायलं. तिना ताजम्हाल् माह्या हातात ठीवला. "पुन्हा कई देशिल त् मुस्काटच् फोडिल" मनली. ति वर्गात घुसली. सुन्या अन विश्याला कई ऐकायला गेलं नवतं. म्या जवळ जाउन त्याहिला महल दाखिला अन जोरात "यार ति पोरगी म्हागच लागलिया. सारखं कई न कई आणून देती" मनलं. सुन्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत हुतो तवा म्या तिरप्या नजरानं पाइलं. विश्यान् हातातल्या पेणाचे टुकड़े केले अन तेव गाड़ीकडं निघुन गेला.
मिसळपाव
सुंदर लिहता हो तुम्ही....
सुंदर ष्टाइल,आणि मस्त कंटेन्ट
अर्रर एवढा दु दु पणा :(
लै डेंजर बेनं हाय. सोताच्या
नवीन शब्द कळला, "नसाहिता";)
लय भारी...
नाही आवडली....चुकीच्या
In reply to नाही आवडली....चुकीच्या by टवाळ कार्टा
उदात्तीकरण ??
In reply to उदात्तीकरण ?? by कपिलमुनी
+१ कथेला
In reply to उदात्तीकरण ?? by कपिलमुनी
१. पोरीला पटवण्यासाठी स्वतः
In reply to १. पोरीला पटवण्यासाठी स्वतः by टवाळ कार्टा
प्रेमात
In reply to प्रेमात by कपिलमुनी
प्रेमात आणि युद्धात सारे
In reply to १. पोरीला पटवण्यासाठी स्वतः by टवाळ कार्टा
@टक्या , हातरुमाल ,मेकअप चा
In reply to @टक्या , हातरुमाल ,मेकअप चा by पियुशा
हातरुमाल ,मेकअप चा डब्बा ,
In reply to @टक्या , हातरुमाल ,मेकअप चा by पियुशा
ओ तै, पोरं काय पोरं, ऑ?
In reply to उदात्तीकरण ?? by कपिलमुनी
+१
In reply to नाही आवडली....चुकीच्या by टवाळ कार्टा
लेखनविषय:: कथाविनोद
In reply to नाही आवडली....चुकीच्या by टवाळ कार्टा
त्यावयात..
ह्यो कथेचा नायक म्हनायचा कि
तू हो म्हन न्हायतर नाय म्हन
कथा आवडली
छान लिहीलय. 'शाळा' आठवला.
आवडली..
हाण्ण.
कथा आवडली..
एकदम कडक.
भारी लिहिता भाऊ.
खल्लास कथा ! प्रचंड आवडली .
आवडली गोष्ट
लय भारी
तुमची शैली चांगली आहे.
पिच्चरात रजनीअण्णा करतात त्या
आवडली
मस्तच!
झक्कास!!
छान लिहिलंय
गोष्ट आवडली.
गोष्ट आवडली.
मला नाय तर कुनाला नाय :)