काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते.
शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले.
मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल.
सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी )
दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी.
एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो. बरोबर मुलगी आणि आम्ही दोघ शाळेत पोहचलो.
नमस्कार चमत्कार झाल्यावर लगेच मुद्यावर हात घातला.
टीचर : तुमची मुलगी साधारण आहे, तिच्यात काही असाधारण असं काहीच नाही, तुम्ही दोघा हि सुशिक्षित आहात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्ही मुलांना तयार केले पाहिजे, तुमची मुलगी कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेत. जेवढा विचारले जाते तेवढंच उत्तर देते. स्वताहून काही करायला मागत नाही.
मी टीचर शी चर्चा( वादविवाद ) करण्यास सुरुवात करताच बायको नि आम्हालाच तंबी दिली. बरोबर बोलताहेत टीचर. मी उद्या पासून अजून जास्त अभ्यास घेत जाईन.
मला खरच कळत नव्हत मी हसू कि रडू, काय चाललाय हे , ३ वर्षाच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायच्या. त्यांनी सर्धेत भाग घ्यायचा.
आणि या स्पर्धा म्हणजे कसल्या ड्रोईग आणि स्टोरी टेलिंग, क्राफ्ट आणि बडबड गीते.
या पूर्वी जिंगल स्पर्धेत मुलीने जॉनी जॉनी म्हटलं तर बाई म्हणल्या हि प्ले ग्रुप मधली कविता आहे, नर्सरी ला याहून अधिक आलं पाहिजे.
या पूर्वीच्या मीटिंग मध्ये बाईनी नी सांगितल ज्या मुलांच्या घरात मराठी मध्ये बोललं जातं त्या मुलांना फोनिक्स च्या क्लास ला घाला, त्याचं इंग्लिश लवकर सुधारतं म्हणे, उच्चार स्पष्ट होतात … मग काय लगेच आमच्या सौ गुगल करून कुठे चांगला फोनिक्स क्लास बघून अडमिशन करून आली मुलीसाठी ( फी महिना २२०० ),
मी शाळेत बाकी पालकांसोबत चर्चा केली, सगळी कडे हेच …. मुलांना आता पासूनच आता पासूनच रेस मध्ये पाळण्यासाठी तयार केलं जातंय.
सकाळी शाळा, दुपारी शिकवण्या, संध्याकाळी आई घरी अभ्यास घेणार, शनिवारी ड्रोईग किंवा कत्थक…. सगळ्या पालकांना आपल्या मुलांना सुपरमेन बनवायचं. दहावी बारावी चे निकाल ऐकावे तर ९९% एवढे मार्क एका मुलाला ?? , गरिबाचे दोन तीन पोरं पास होतात तेवढ्या मार्कात.
मला कळतंय स्पर्धेचं युग आहे पण किती आणि कधी पासून…. लहान लहान मुलांचं बालपण हरवत चाललय. काय हा अनाठाई हट्ट, काय साध्य करतोय आपण.
मला आठवतंय मला ५वीत इंग्रजी विषय पहिल्यांदा आला तेव्हा परीक्षेत माय नेम इस उमेश असा लिहिताना may name is umesh असा लिहिल होतं , भोपळा मिळाला होता त्या प्रश्नाला, ५वीत इंग्रजी विषयाला सुरुवात करूनही आमचं काही बिघडलं नाही, ३ वर्षांच्या मुलांकडून काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या.
३ वर्षाची असताना जर तिला नाही कळाला कि भेंडी ला लेडी फिंगर म्हणतात तर कुठे बिघडलं.शिकेल ती आज नाही तर उद्या, भेंडी ला लेडी फिंगर नाही म्हटलं तरी भेंडीच राहणार, त्याचा बटाटा नाही होणार.
संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत काहीतरी काम करत होतो , कन्या बाहुबली चित्रपट बघत होती , अचानक धावत आली म्हणाली " बाबा बाहुबली नि त्या काकुंचे कपडे काढले " ( चित्रपटात एक गाणं आहे त्यातला काही रोमेंटिक सीन सुरु होता )
मी तिच्या चेहर्याकडे एकटक बघत राहिलो. काय बोलावं काही सुचेना.
माझं मन म्हणत होतं अजून आभाळ फाटायचं बाकी आहे. !!
वाचने
23042
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलीला आमच्याकडुन happy
माफ करा, पण ह्या स्पर्धेत
+ १ हेच म्हणते . शाळा किती
In reply to माफ करा, पण ह्या स्पर्धेत by परिकथेतील राजकुमार
हे कशाचं विडंबन आहे?
बाहुबली
In reply to हे कशाचं विडंबन आहे? by जव्हेरगंज
बाहुबली घटनेमधुन
In reply to बाहुबली by मीउमेश
ते एक सेटिंग असते.tutionसाठी
भयंकर.
+१
In reply to भयंकर. by प्रभाकर पेठकर
शहर सोडा
ओके.
माझ्या घराच्या अगदी जवळ एक
:-))
In reply to माझ्या घराच्या अगदी जवळ एक by उगा काहितरीच
खराडी बायपासला पाहिलंय
In reply to माझ्या घराच्या अगदी जवळ एक by उगा काहितरीच
गर्भसंस्कार नावाच्या
In reply to माझ्या घराच्या अगदी जवळ एक by उगा काहितरीच
पालकांची हौस
३५०००!!!!!!!!!
In reply to पालकांची हौस by सर्वसाक्षी
तुमचा लेख जणु मीच लिहिला
3 वर्षाची पोर शाळेत जाते हेच
बेस्ट. नो क्लास अन नो झंझट.
In reply to 3 वर्षाची पोर शाळेत जाते हेच by प्यारे१
मधे एकदा लग्न पण कर. ;)
In reply to बेस्ट. नो क्लास अन नो झंझट. by अभ्या..
नमस्कार करतो हं प्यारेकाका.
In reply to मधे एकदा लग्न पण कर. ;) by प्यारे१
सुखरूप भव!
In reply to नमस्कार करतो हं प्यारेकाका. by अभ्या..
नमस्कार
In reply to नमस्कार करतो हं प्यारेकाका. by अभ्या..
अभ्यास, नमस्कार का अगाउपणा
In reply to नमस्कार by सस्नेह
सहमत..
In reply to बेस्ट. नो क्लास अन नो झंझट. by अभ्या..
एकच सांगेन
बरोबर आहे रंगा
In reply to एकच सांगेन by चतुरंग
पण तू सध्या कुठे आहेस? ;)
In reply to बरोबर आहे रंगा by संदीप चित्रे
शिक्षणाच्या धाग्यात
बाहुबली
In reply to शिक्षणाच्या धाग्यात by मित्रहो
खुलाशाबद्दल धन्यवाद
In reply to बाहुबली by मीउमेश
खुलाशाबद्दल धन्यवाद
In reply to बाहुबली by मीउमेश
दॅट विल बी "न्यू नॉर्मल"
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद by मित्रहो
नॉर्मल
In reply to दॅट विल बी "न्यू नॉर्मल" by संदीप डांगे
अशी वेळ कधिच येणार नाही, कारण...
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद by मित्रहो
माझा मुलगा आता ५ वर्षाचा झाला
जाऊदया... पुढच्या वर्षी
अशा शाळेत टाकतात, तर विचार
लेख आवडला. विषय उत्तम आहे.
प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर
कौतुक माझं, स्तुति माझी आणि
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
प्यारे मियांशी बाडिस
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
+१००
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
+१०००००
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
आवड्या!
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
सहमत
In reply to आवड्या! by चांदणे संदीप
भाई दिल जित लैस!!
In reply to प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर by प्यारे१
२०२५, एक नवरा बायको फॅमिलीमधे
लग्नाळू
In reply to २०२५, एक नवरा बायको फॅमिलीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
संगती दोष
In reply to लग्नाळू by कपिलमुनी
चहूकडे असेच लोक्स पैदा होऊन
In reply to २०२५, एक नवरा बायको फॅमिलीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
ट्रिनीटीतैंना विसरल्याबद्दल
In reply to चहूकडे असेच लोक्स पैदा होऊन by बॅटमॅन
अर्र हो की. आयमाय स्वारी.
In reply to ट्रिनीटीतैंना विसरल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरेरे
In reply to अर्र हो की. आयमाय स्वारी. by बॅटमॅन
अगा बाब्बो मेलो मेलो मेलो =)
In reply to अरेरे by आदिजोशी
लेका दोन असल्या तर बिघडलं
In reply to अगा बाब्बो मेलो मेलो मेलो =) by बॅटमॅन
तसं बिघडलं नाञ म्हणा, पण ते
In reply to लेका दोन असल्या तर बिघडलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
भावा लांब रहा
In reply to तसं बिघडलं नाञ म्हणा, पण ते by बॅटमॅन
वंवु साधी भोळी घरगुती असेलही
In reply to भावा लांब रहा by आदिजोशी
मांजरबाईसुद्धा बाईच की बे.
In reply to वंवु साधी भोळी घरगुती असेलही by कॅप्टन जॅक स्पॅरो
वंडरवुमन घरगुती?????? उद्या
In reply to भावा लांब रहा by आदिजोशी
हसुन फुटलो =)) बाकी एनजीओंना
In reply to वंडरवुमन घरगुती?????? उद्या by बॅटमॅन
अंशतः सहमत!!
In reply to हसुन फुटलो =)) बाकी एनजीओंना by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणराव, कुठल्याही एनजीओत काम
In reply to हसुन फुटलो =)) बाकी एनजीओंना by कॅप्टन जॅक स्पॅरो
केलेलं नसलं तरी बघण्यामधे आहे
In reply to चिमणराव, कुठल्याही एनजीओत काम by संदीप डांगे
तुमच्यासारख्या आयडीकडून
In reply to केलेलं नसलं तरी बघण्यामधे आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
पिंकटाकु प्रतिसाद नाहिये. मी
In reply to तुमच्यासारख्या आयडीकडून by संदीप डांगे
आता स्पष्ट बोललाच आहात तर
In reply to पिंकटाकु प्रतिसाद नाहिये. मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी फोनेटिक्स करायचं झालं तर
चांगले विचार आहेत.
शाळेत जे सजेस्ट करतील ते आपण
+ १००
In reply to शाळेत जे सजेस्ट करतील ते आपण by अजया
माझ्या मुलीच्या शाळेत घरी
छान लेख. काही प्रतिसाद मनन
आवडला
सगळ्यात पहिल्यांदा, तुम्हाला
पिरा - उत्तम प्रतिसाद.
In reply to सगळ्यात पहिल्यांदा, तुम्हाला by पिलीयन रायडर
पिराताई,
In reply to सगळ्यात पहिल्यांदा, तुम्हाला by पिलीयन रायडर
व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धा आवश्यक.
In reply to पिराताई, by संदीप डांगे
स्पर्धेला ना नाहीये कुणाची.
In reply to व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धा आवश्यक. by प्रभाकर पेठकर
पुन्हा वाच.
In reply to स्पर्धेला ना नाहीये कुणाची. by प्यारे१
पेठकरकाका,
In reply to पुन्हा वाच. by प्रभाकर पेठकर
दोन्ही आवश्यक.
In reply to पेठकरकाका, by संदीप डांगे
लेखकाच्या मुलीची शिक्षिका काय
In reply to दोन्ही आवश्यक. by प्रभाकर पेठकर
सॉरी.
In reply to लेखकाच्या मुलीची शिक्षिका काय by संदीप डांगे
तक्रार करा.
In reply to पेठकरकाका, by संदीप डांगे
सहमत
In reply to तक्रार करा. by प्रभाकर पेठकर
माफ करा पण मला हे झेपतच
In reply to व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धा आवश्यक. by प्रभाकर पेठकर
मी उमेश ह्यांनी इथे हा लेख
In reply to माफ करा पण मला हे झेपतच by शब्दबम्बाळ