Skip to main content

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 26/11/2015 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये.

अस्तित्व?

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 26/11/2015 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व : भुंड टेकाड आज एकाकी पडलयं. अस्तित्व काय असतं हो? त्याचा वैरान माथा ऊन्हात तळपतो. ऊन्हाच्या झळयात डोळे दिपून जातात. मुसळधार पावसाचा एखादा थेंब त्याच्या वाट्याला येतो. पालवी फुटते आणि क्षणात कोमेजुन जाते. अस्तित्वाच्या पाऊलखुणा सांगत केवळ एक वाळलेलं पातं मागे ठेवते. टेकाडावर गवताच्या काड्यांचा खच पडलाय. वाऱ्याचा एखादा झोत त्यांना तितर बितर करतो. धुळदान पाती दगडा धोड्याखाली चिरडली जातात. कुण्या एकेकाळी फुललेलं जंगल असंच अशक्त होत मातीत गेलं. ही मातीच तेवढी अस्तित्व दाखवत शिल्लक राहिली. मातीलाही अस्तित्व असंतचं तर. कुठुन एखादा कोंब या मातीत फुटतो. भुंडं टेकाड टवकारुन त्याच्याकडं बघतं.

अस्थी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 26/11/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो होत होतो या जगी मी मानवी देहात ना!? पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!! याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!
काव्यरस

क्षणो क्षणी

लेखक विश्वव्यापी यांनी गुरुवार, 26/11/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखाच्या साम्राज्यातून जन्म घेत असते पहाट क्षणो क्षणी प्रकाशाला गिळून पुन्हा एकदा पुढे सरकतो अंधार क्षणो क्षणी अविश्वासाच्या भिंती फोडून अवतरतो विश्वास क्षणो क्षणी विश्वासाचा बळी घेऊन पुन्हा 'मी' म्हणतो अविश्वास क्षणो क्षणी दुखा:च्या खोल खायीतून वर येत असते सुख: क्षणो क्षणी सुख:च्या या संथ जालावर दुखा:चे हि तरंग उठती क्षणो क्षणी मृत्यूच्या विराट मुखातून जन्म घेत असते जीवन क्षणो क्षणी जीवन हे पुन्हा एकदा देई मृत्यूस आमंत्रण क्षणो क्षणी अजय सरदेसाई (मेघ) 19/09/1994 9:00 AM

कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन

लेखक विश्वव्यापी यांनी गुरुवार, 26/11/2015 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ? पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ?

वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 26/11/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल की परवाच वर्तक कुटुंबियांना दुबईतुन भारतात जाउन सहा वर्षे पूर्ण झाली! आणि आज ब्लॉग चाळता चाळता हा लेख मिळाला… वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र' अभिजीत वर्तक. चैत्रा वर्तक. प्राजक्ता वर्तक. सुरुवात करतो अभिजीत पासून... सुरुवातीला झीरो कट... नंतर सचिन टाइप्स... आता जवळपास झाकीर.. किव्वा डिट्टो शंकर महादेवनचा मुलगा, सेम हेयर स्टाइल! फूल दिल से क्यारेक्टर... सीधी बात नो बकवास वाला! आमची ओळख कशी झाली, डोक्याला ताण द्यावा लागतोय, आठवलं... २००८.. नवीनच होतो दुबैत, एका कामा निमित्त मी त्याच्या घरी गेलेलो, ८-९वाजले असतील...

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी विशाल (२६-११-२०१५)

खफवरची गाणी

लेखक मांत्रिक यांनी गुरुवार, 26/11/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे एक सदस्य नाव आडनाव यांनी विनंती केल्यावरुन खरडफळ्यावर मी अपलोड केलेल्या काही गाण्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरुपात देत आहे. खरडफळ्यावर डस्टर फिरवल्यावर अर्थातच ते सर्व उडल्या गेले आहे. गाणी मुख्यतः वेस्टर्नच आहेत. हिंदी गाणी आपल्या सर्वांना माहीतच असतात, म्हणून नमूद करत नाही. गाणी मुद्दाम embed न करता केवळ टेक्स्च्युल यूट्यूब लिंक्स देत आहे. त्यामुळे धागा उघडल्यानेच डाटा खर्च झाला असं नको व्हायला. ज्यांना या धाग्यात रस नाही, अशा व्यक्तिंचे त्यामुळे नुकसान होणार नाही. प्रत्येक गाण्याचे शक्य तितके ऑफिशियल व्हर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

"आत्मा" ज्ञान!!

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 26/11/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष :- १९८९-९० स्थळ :- १०१ ची गच्ची वेळ :- पोटं भरलेल्याची पात्रं :- मेंदू क्रमांक-१ (संजय पाटील) मेंदू क्रमांक-२ (बाजी प्रभू) मेंदू क्रमांक-३ (किरण केंचे) मेंदू क्रमांक-४ (राजेश सोनावणे) एका टळटळीत दुपारच्यावेळी संजयने शिट्टी मारून ९७ मध्ये असलेल्या मला!..येण्याचा इशारा केला. उड्या मारत त्याच्याकडे गेलो तर तिकडे बाकीचे दोन मेंदू आधीच हजर होते...संजयच्या पहिल्याच प्रश्नाने मी ताडकन उडालो.... ये आपण 'प्लँचेट करायचं का? खरंतर संजयला करूयात का?

पूर्वेच्या समुद्रात - ११

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 26/11/2015 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १, , , , , , , , , १० पूर्वेच्या समुद्रात - ११ नारकोंडम बेटाची सफर हा भाग मी अगोदरच लिहिला होता.