Skip to main content

घोस्टहंटर-१

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 16/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/12/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका भाग २ - नासदीय सूक्त भाग ३ - अस्तिस्तोत्र भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी अगदी कट्टर नास्तिक सोडले तर बहुतेक लोक कुठच्या ना कुठच्या उच्च शक्तीचे अस्तित्व मानतात.

आतातरी जाग

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 16/12/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
उठा करुणाकरा पसरला काळोख सैतानी प्रवृत्तीची वाढली लगबग दयाघना आतातरी जाग ! क्रूसावरी लटकुनी करू नका डोळेझाक आंधळ्या जगात डोळस सावज प्रभो आतातरी जाग ! सीता जरी सुटली मातले रावण विवस्त्र द्रौपदीला पदरात घाल दयानिधी आतातरी जाग ! अश्वत्थाम्याच्या शराने डळमळे उत्तरेचा गर्भ अनिष्ट प्रव्रुत्तींचा करा विसर्ग श्रीहरी आतातरी जाग ! दिवस ग्रासल्या काळोखाला दाव प्रकाशास्त्र रुतल्या रथाचे सारथ्य त्याग विश्वरूपा आतातरी जाग ! विजयकुमार......... ०४.०९.२००९,मुंबई

माहिति हवी आहे - हरिहरेश्वर श्रिवर्धन दिवे आगार

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 16/12/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याहून हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवेआगर , शिव्थर्घळ इत्यादी ठिकाणी २५ तारखेच्या आसपास भेट देण्याचा विचार आहे. दोन रात्री आणि तीन दिवस सहलिचा प्लान आहे. सहलिचा क्रम कसा असावा , या भागातील राहण्याची सोय याबद्द्दल माहिति असल्यास क्रुपया मार्गदर्शन करावे. या सहलित अलिबाग सुद्धा करता येइल काय? आगाउ.... मनापासुन आभार.

सॅचुरेशन पॉइंट

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 16/12/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक सूर्य चांदण्या रात्री संथ जलाशयात खड़े मारत बसलेला दिसला 'रस्ता चुकलायस का मित्रा?' त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले म्हणाला ... कंटाळा आला राव ! रोज रोज पूर्वेकडे उगवायचं स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं.. रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु ते काय म्हणता तुम्ही? संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा काहीतरी नवीन.. काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा एखादी हळुवार कविता ऐकावी एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं अगदीच काही नाही तर गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी आणि मग... शांतपणे पाण्यावर उठणारे तरंग पाहात बसला एक विलक्षण शांतता.. वाऱ्याची नाजुकशी सळसळ अचानक कुठुनतरी पाखरांची किलबिल कानी आली

मोसाद - भाग १

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 16/12/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
1 . जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय (the second oldest profession in the World) म्हणजे हेरगिरी. जवळपास सर्व देशांकडे आज गुप्तचर संघटना किंवा संस्था आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. गुप्तचर किंवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र ‘ मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 16/12/2015 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात.

बुलेट ट्रेन ला काही पर्याय

लेखक प्रणवजोशी यांनी मंगळवार, 15/12/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेख थोडा छोटा झाला आहे त्याबद्दल मिपाकर क्षमा करतील अशी आशा आहे . ---------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक राज्यात आपल्या देश कि रेल ने विकासाची नक्कीच नवी गंगा आणायला हातभार लावला आहे ह्याबद्दल शंका नाही. विविध प्रगत देशात जलदगती गाड्या पाहून आपल्या नेत्यांना त्याची स्वप्ने पडू लागली. France-SNCF , ब्रिटीश रेलची इंटरसिटी १२५ तर अमेरिकेची Acela express. पण ह्या सगळ्यांना मागे टाकून जपान रेल ची बुलेट ट्रेन मोदिजींच्या मनात बसली. आता विकास हा व्हायलाच हवा.

'शिग्रेट'!

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 15/12/2015 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला. मला दोन रुपय दिलं आन मनालं "जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं" बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला. सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला. पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा! मग काका दिसला. शिग्रेट दिली.