एकटेपणाच्या कविता
1..
सगळीकडून कोसळतय
आभाळ एकटेपणाचे
अन ते दडलेत
झाडाआड
अजाणतेपणाची झूल पांघरून,
मी उदासगीत गात
प्रकाशकवडसे टिपत
रस्ता कापतो
जावून येऊन
काय त्या सावलीची सोबत.
तसं सारं शरीरच
भेगाळलयं
उन्मादी लस स्त्रवतेयं
सगळीकडून,
झडत जाणारे सारे अवयव
अन्
मनाने खचलेला मी
सारं सारं सामावून जाव ह्या
कराल अंधारात
अन् जाणीव उरावी
काही नसण्याची.
तिनं देलेला डाग
आजही चरचरतो मनात
जेव्हा काहूर उठते
फेसाळण्याचे,
ती ढसाढसा रडलीपण होती
मला पदराआड घेवून
कुशीत असून नसल्याचं
ते एकटेपण
आजही उठवते झोपेतून,
घामेजला मी
दचकून पांघरुणात शिरतो,
आजूबाजूला कुणीच नसतं
ती सुध्दा.
विजयकुमार.........
मिसळपाव
एकही गोळी न झाडता तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवला, तर तो जास्त महत्त्वाचा असतो. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या तेथील बदलत्या जनमताची साक्ष देणाऱ्या आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, हा पाकचा बचाव देशाची मान खाली घालायला लावणारा आहे. पाकनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावलेली आहे.
.
.