उडुपी पासून कुठे कुठे जाऊ शकतो?
मी हा नवीन धागा काढतेय कारण मला लवकर फ्रेश प्रतिसाद हवेत आणि जो धागा मला चटकन मिळेल. नंतर हवे तर धागा उडवला किन्वा सरकवला तरी चालेल.
आम्ही सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी ट्रीप ला जायचे म्हणतोय . नोवेंबर एका मित्राचे लग्न आहे उडुपी मध्ये, लग्नाचे २ दिवस तोच सोय करून देणार आहे . पण त्यानंतरचे ३-४ दिवस थोडे फिरायचे म्हणतोय . तर मग आता तुमची पाळी… उडुपी पासून कोणती ठिकाणे आहेत जी आम्ही फिरू शकतो? जसे एक कुर्ग आहे, पण ते उडुपी पासून ९ तासांच्या drive वर आहे. मला ठिकाणे आणि तिथे काही अश्या जागेची माहिती हवीय जिथे आम्ही ८-९ च्या ग्रुप ने जाऊ शकतो. आम्हाला एखाद्या बंगल्यात राहायची इच्छा आहे.
मिसळपाव
मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे.