मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडीबोली गझल - " बदल "

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
किती कोसावर कोनाची कहानी बदलते नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा? बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते? इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते उधारीची जिनगी जगला तई थो समजला उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते? इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा? निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते * कई = कधी * थो = तो * चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.

वाचने 2112 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/04/2016 - 07:57
भाषेसहित गझल आवडली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 25/04/2016 - 11:10
+१

पिलीयन रायडर 25/04/2016 - 11:13
आवडली. ही बोली मला आवडलीच आहे फार. ती बोलीच छान आहे म्हणुन की तुम्ही छान लिहीता म्हणुन ते नक्की माहिती नाही. :)

नीलमोहर 25/04/2016 - 13:09
बोली भाषेतील लिखाण मनाला नेहमीच स्पर्शून जाते.

चांदणे संदीप 25/04/2016 - 13:19
झाडीबोलीने अगदी झाडून टाकले! कस छान दिसतंय मिपांगण! :) Sandy

बोका-ए-आझम 26/04/2016 - 16:18
इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा? निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते
हे मस्तच! बोलीभाषेतली गझल हा प्रकार भारी आहे.