Skip to main content

जग हे मधुशाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 28/06/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
जग हे मधुशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला ज्याची त्याला प्यारी बाटली बाटली तले सखे सौंगडी देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी लुडके नजर न धावे चकण्या पलीकडे गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला कुणा न माहीत किती ढोसले ते कोठुन आलो ते नच स्मरते उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
काव्यरस

विरह ........

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 28/06/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊल कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता, मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होते, मला मन आहे, विचारशक्ती आहे, याच भानंच नव्हत! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरंच वाटत नाही आपण इतकं काही भोगलंय! पण आता त्या आठवणीसुध्दा सोबत सोडतील, मन पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊ लागले! सात वर्षापुर्वी आमची पहिली भेट!

हायकू – एक काव्य प्रकार

लेखक उल्का यांनी सोमवार, 27/06/2016 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली. तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली. हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते.

गझल - आणि हा खेळ झाला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/06/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक
काव्यरस

मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 27/06/2016 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

पाऊसगाणे...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...

मनातले माझ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी रविवार, 26/06/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी आज आशेचा किरण शोधु लागले.......
काव्यरस

.....माझा शेतकरी राजा.....

लेखक Bhagyashri satish vasane यांनी रविवार, 26/06/2016 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
शेतामध्ये राबतो माझा शेतकरी राजा मन त्याचे साधेभोळे, नाही कुणाचा हेवा मनाच्या गाभार्यात शोधता नाव त्याचेच सापडे अशी कशी वेडी मी त्याच्या वरी प्रेम करे माझ्या सुखासाठी तो रात्रंदिस झरे असा माझा साधाभोळा शेतकरी राजा मन जीवन कोरे पान माझे त्यावरी नाव त्याचे मी लिहिले माझे सौभाग्य त्याचे अर्धांगिणी मी झाले सात जन्मांची साथ आमची जगा सांगुणही न कळे प्रीती त्याची त्याच्या वेदनांना औषध माझ्या प्रेमाचे काट्यांच्या वाटेवर गाव त्याचे लागते मन माझे त्या काट्यांच्या वाटेवरही त्यालाच शोधते, शोधते मन जिथे तो नसतो माझा हा वेडेपणा पाहून आरसा माझ्यावर हसतो, एकटी माझी सावली प्रश्न मला करते होता जो सोबतीला
काव्यरस