Skip to main content

निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

लेखक Anand More यांनी सोमवार, 25/07/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो.

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

ती - ६

लेखक खटपट्या यांनी रविवार, 24/07/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती - २" "ती" - ३ "ती - ४" ती - ५ "ती" - ६ शेवटी अतुलला गाठलाच. सरळ विचारले काय चालले आहे. तर म्हणाला "काही नाही, इकडच्या तीकडच्या गप्पा" "काय रे अतुल, तु असा कीतीसा ओळखतोस नेहाला? तासनतास गप्पा मारतोस.

झाकलेले सत्य

लेखक माहीराज यांनी रविवार, 24/07/2016 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
निर्दयी रुपे दिसती निर्दोष वासरेे सत्य सारे झाकलेले सारेच भास रे पाप सारे झाकुनी दर्शनी साधुच सारे झाकल्या चेहर्यावरती मुखवटे हासरे ।। गोर्या वस्ञांमागे काळीच कारस्थाने शेंदुर थापुनी देती धोकेच प्रामुख्याने सार्यांचा विश्वास आंधळा,                  आंधळीच भक्ती येथेच विस्तारते क्रुर अंधकार शक्ती ।। श्रद्धा असावी परी अंधश्रद्धा नसावी परमेश्वराची वस्ती माणसात असावी माणसाला माणुसकी हिच जात दिसावी चांडाळ ढोंगीपणाला कधी न फसावी..।। तेहत्तिस कोटी देव रुपे असे या भुवरी तरी खोट्या मुर्खांची का जादु सर्वांवरी सोडा तो अ

( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... आयटम नं लाईन दिली काय, न दिली काय, आपल्याले हुंगत ऱ्हायची सवयच हाय, च्यान्सवर ड्यान्स मारीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... चिकनी पोरगी पटली काय, न पटली काय, पोट्ट्यान्ले चप्पल खायची वायली हौसच हाय, चपलीलाबी फुलाने सजवीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो...
काव्यरस

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... राया तो माजा भ्येटंल काय, न भ्येटंल काय, वाट पहायाची आपली पुरी तयारी हाय, दैवाचीबी परीक्शा घेइन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... जीवाचा सखा गावंल काय, न गावंल काय, समदं ह्या कपाळी लिव्हल्यालं हाय, नशिबासंगं आज पैज लावीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... आयुक्शाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, धन्यासाटी आगीशीबी खेळने मंजूर हाय, डोरलं त्येच्याच नावचं गल्यात घालीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते ...
काव्यरस

फिलिंग आवसमला

लेखक फुंटी यांनी रविवार, 24/07/2016 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
काव्यरस

असे कधी घडत नसते

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच, तुमची चाल मंदावू लागते कितीही नास्तिक वा धीट असलात तरी, हलकेसे भय तुम्हास वाटू लागते. श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. शरीर थोडेसे घामेजू लागते. वळण ते पार होताच मात्र, तुमची स्थिती पूर्वपदावर येते. कधी तरी घरी पोहचता. घर जणू तुम्हाला आलिंगन देते. फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष. तुम्हास ते सारे खटकू लागते. तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची, तुम्हाला चिड येऊ लागते. कधीतरी होते सारे असह्य. तुमच्या तोंडून किंकाळी फुटते. माणसे, घर सारे... काहीच नाही! जणू विरून गेले, तुम्हाला जाणवते. 'ते' वळण अजुनही न सरले. खरंच, असे कधी घडत नसते?

रिमझिम रिमझिम

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम रिमझिम पाऊसधारा न्हाऊनी निघाला आसमंत सारा बेधुंद अशा या क्षणी साथ तुझी हवी साजणी ओले ओले वृक्ष अन वेली पानांवरून टपटपते पाणी त्यात आठवली तुझी कहाणी ओलावली मग डोळ्यांची पापणी खळखळत वाहणा-या या नद्या मिळतात सागराला सा-या का न मग होई आपले मिलन प्रश्न पडे हा फार गहण भरारत वाहणारे हे वारे आले अंगावर शहारे दुःखाने मी कळवळतो हृदयाच्या वेदनेने विव्हळतो चिंब चिंब झाले माझे तन दुःखाने भिजले माझे मन आसवांचा आला आहे पूर सापडेना आयुष्याचा सूर
काव्यरस

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/07/2016 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो.
काव्यरस