Skip to main content

बेधुंद (भाग १६ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 09/08/2016 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर ६ (२००५ ) सुट्टीवरून पुन्हा कॉलेजला परत आल्यानंतर 'सम' सेमिस्टरची मस्ती सुरु झाली . अक्षा सोडला तर ,काही कुणाचे जास्त मार्क्स बदलले नाहीत . नेहमीप्रमाणे चंद्या , तात्या ,अश्विनी टॉप लिस्ट मध्ये , अक्षाचे मार्क्स जरा चांगलेच सुधारले होते अन पहिल्यांदाच तो टॉप ७ मध्ये आला होता , एकंदर 'फाईव्ह स्टार्स' चे ३ तारे पहिल्या १० मध्ये होते . सुऱ्याचे दोन विषय उडाले होते , 'नेट'वर पाहिजी तितकी मस्ती केल्याने असेल कदाचित ! नित्या कसाबसा पास झाला होता ,परीक्षेच्या काळात १-२ महिने तो 'वरच्या' मेरीट लॉबीत येऊन राहत असे , चंद्या ,तात्या अन अक्षावर त्याला टॉपिक समजवून द्यायची जबाबदारी असे !

बौद्धधर्मप्रसारक... भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2016 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक...

मिपाकरा तुमची कहाणी

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 09/08/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लहानपणी आमची आजी दर रविवारी कहाणी वाचायची. साडेतीन तांदळाचे दाणे हातात घेऊन आम्ही ती एकायचो. हळू हळू तर ती पाठ पण झाली होती कहाणी. श्रावण सुरु झाला की कायम त्याची आठवण होते. हळूहळू मिपाशी एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते आहे... त्या भावनेतूनच ही कहाणी सहज सुचली आणि इथे देत आहे.. गोड मानून घ्यावीत. ************************************************************************************** एका मिपा करा देवा तुमची कहाणी. आटपाट संकेत स्थळ होत. त्याच नाव मिसळपाव होत. त्यातील सदस्यांची नावं अगम्य होती. हॉटेलात येणाऱ्या-जाणाऱ्यांची आवड विविध.... तरी एक होती. कंपूबाजीची आवड काहीजणांना होती.

रेनफॉरेस्ट

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 09/08/2016 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज जिथे आहे सहरा म्हणजेच वाळवंट, रेग, सैफ़, बरचन (म्हणजे काय हे गुगलून घ्या) वगैरे भूवैशिष्टये असणारे, तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो (म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे कोट्यावधि वर्षांपूर्वी) सहस्र योजन विस्तार असलेले ओलेचिंब, घनदाट, निबिड रेनफॉरेस्ट! रोज दुपारी दोनतीन वाजता गड़गडाट करायचे अजस्र काळेकभिन्न क्युमुलोनिम्बस् ! अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलील

८० वर्षांच्या मुलीचा चांगुलपणा कसा कमी करु?

लेखक लीना कनाटा यांनी मंगळवार, 09/08/2016 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ८० वर्षांच्या सासुबै प्रचंड समंजस आणि मनमिळावू आहेत. त्या सगळ्या गोष्टी नीट व व्यवस्थित करतात. त्या मला भांडण करायची संधीच देत नाहीत. त्या मुळे माझा संयम संपता संपत नाही आणि मला त्यांना शाब्दिक फटके देता येत नाहीत ज्याची परिणीती नंतर मला वाईट वाटण्यात होते. त्यांना म्हणे मी भांडत नाही आणि आमच्यात कधीही शाब्दिक चकमक, रुसवे फुगवे होत नाहीत याचा फार आनंद होतो. असं त्या सगळीकडे सांगत असतात विशेषतः माझ्या मैत्रिणींना, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींची सहानुभूती गमावते आणि माझ्या मनासारखे काहीच होत नाही.

हरवलेलं विश्व (भाग ३)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 08/08/2016 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 भाग ३ क्षणभर विचार करुन योगान म्हणाला,"तुमची उत्सुकता कौतुकास्पद आहे. आजवर कित्येक प्रवासी येऊन गेले. काही हौशी-मौजी होते. काही अभ्यासक तर काही शास्त्रज्ञ... अनेकांना अनेक गोष्टी मी दाखवल्या. त्यांना देखील तुमच्यासारखिच उत्सुकता होती. पण 'अस्पर्श मंदिर' अस कधीच कोणीच विचारल नाही. का बर तुम्ही अस विचारावत? पण जाऊ दे ते.

मोबाईलच्या देवा तुला.....

लेखक विप्लव यांनी सोमवार, 08/08/2016 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईलच्या देवा तुला टचिंग टचिंग होऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे जरि लेनं गरिबीचं घेऊ हाती स्मार्टफोनचं असल जरि चायना तरि दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे मोबाईलच्या बॅटरिची कांडी होई वरखाली स्विचऑफ आता होईल देवा चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे चॅट थोडे कॉल थोडे करतो आम्ही कधीमधी मॅसेज येती मॅसेजवरी वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे ------अकस्मात हल्ला विप्लव
काव्यरस

लग्न..एक लोक कथा..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 08/08/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न..एक लोक कथा.. ....................................... एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले.... व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते.. घरात म्हातारी आजी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार?

गेम = डुआयडी

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 08/08/2016 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : गेम आयडी कसा बदलता आला पाहिजे डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे सगळ्यांना हे जमतंच असं नाही... धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत.. सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं .. 'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज' करत...

आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/08/2016 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा कॉमनवेल्थ खेळांच्या आधी लिहिली होती - या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही). दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्णमेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे.