Skip to main content

चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 13/09/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याच महिन्यांपूर्वी एक कविता वाचण्यात आली होती. वाचता वाचताच तिचा केलेला हा भावानुवाद. मूळ कविता चार्ल्स बुकोवस्की या जर्मनीत जन्मलेल्या रशियन नावाच्या अमेरिकन कवीची. ओबडधोबड आयुष्य जगलेला हा लेखककवी लहानपणापासून अनेक थपडा खात हेलकावत राहिला. आत्यंतिक छळ, बेदम मार आणि कुचेष्टा हा दिवस आणि रात्रीसारखा त्याच्या आयुष्याचाच एक भाग होता. त्यातच कुठेतरी लिहितं व्हायची इच्छा कशी कोण जाणे मनात दबा धरून राहिली होती. मात्र प्रकाशकांच्या अगम्य अनुभवांचे धक्के न पचून त्याने लिहिण्याकडे पाठच फिरवली. तसंही त्याच्याभोवतालच्या जगात लेखन उपरं होतंच. ते परागंदा झालं, इतकंच.

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

लेखक निनाव यांनी सोमवार, 12/09/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी - निनाव (१२.०९.२०१६) व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
काव्यरस

नाचत ने मज

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 12/09/2016 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय. पिलियन रायडर यांनी अन्यत्र आम्हा घरी धन या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे Scent of a Woman या चित्रपटातील अल पचिनो या कलाकाराच्या अंध पात्राने टँगो नृत्य करतांना हे गाणं चित्रित झालेलं आहे.

दाद

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 12/09/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
दाद . (कथा) . (काल्पनीक) जांभेवाडी.. चारी बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं , निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं गाव . जेमतेमच लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये वीज , एस टी , वाहने अशा आधुनीक सुधारणा अजुन पोचलेल्या नव्हत्या . हे गाव या सुविधांपासुन तसं दुर्लक्षितच राहिलं होतं . रोजच्या कामांसाठी , गरजांसाठी जांभेवाडीच्या ग्रामस्थांना तालुक्याच्या गावाचाच आधार होता . जांभेवाडीपासुन तालुक्याच्या गावाकडे जाणारी एक पाउलवाट होती . आपल्या कामांसाठी , गरजांसाठी गावकरी हिच पाउलवाट तुडवत तालुक्याच्या गावाला जात येत असत . हि लांबची पायपीट आता त्यांच्या रोजच्या जीवनाचाच भाग झाली होती .

राऊ कादंबरीमधील एक प्रसंग

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 12/09/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
राऊ कादंबरी परत एकदा वाचून संपवली. प्रत्येकवेळी ती मनाला वेगवेगळ्या प्रकारे भिडते. अनेकांनी अनेकदा त्यावर लिहिलं आहे. चर्चा देखील झाल्या आहेत. अलीकडे बाजीराव-मस्तानी सिनेमा देखील येऊन गेला. त्या काळात तर पेशवे... मराठा साम्राज्य... प्रेम... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच. म्हणून परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. त्यातील एक प्रसंग मनात खूप भिडला.. टोचला... जेव्हा मस्तानीला आपा पुणे सोडून जा सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात.

आमचा मेलबर्न मधला गणेशोत्सव 2016

लेखक फिझा यांनी सोमवार, 12/09/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , वसुधैव कुटुंबकम मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच संस्कृती मधून आलेले , आपल्या परंपरेचे आणि भाषेचे जतन करणारे काही मराठमोळे लोकं मेलबर्नच्या वेस्ट भागात राहतात . त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन २०१६ च्या सुरुवातीपासून आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी , आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचा , भाषेचा , रितीरिवाजांचा विसर पडू नये म्हणून छोटे मोठे मराठी सांस्कृतीक प्रोग्रॅम करायचे ठरवले. हळू हळू हाच ग्रुप वेस्ट मेलबर्न मराठी WMM या नावाने चालू झाला. लोकांचा मराठी उत्साह आणि आपल्या संस्कृतीची ओढ सगळ्यांनाच !

कामगार....

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार.... सायंकाळी रोजगार सारा गुत्त्यावर झोकुनी गेले घंटानाद करीती पुजारी परी देव अन दैव त्यांचे झोपुनी गेले मिटले डोळे सरणावरी घेणेकरी हात शेकून गेले वाहत्या नदीत राखेबरोबर कुंकू कुणाचे वाहून गेले वसूल करावयाचे म्हणुनी उरले सुरले तेराव्याचे जेवून गेले माय उपाशी, पदराआड पोर, ओठ त्याचे सुकून गेले राजेंद्र देवी
काव्यरस

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य.

‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 12/09/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम. अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण (भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर?

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

लेखक इरसाल यांनी सोमवार, 12/09/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ? हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते. जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो.