एक भटकंती रानवाटांची...
नमस्कार मित्रहो,
आज गोष्ट सांगणार आहे माझ्या लोहोपे तलाव भेटीची.
तर झाले असे कि, 50x7 हे आव्हान तीळसे येथील शिवमंदिराला भेट देऊन पूर्ण केल्यानंतर अस्मादिकांनी तानसा जलाशयावर स्वारी नेण्याचे आयोजिले होते मागच्या रविवारी. परंतु ऐन वेळी आमचे सहप्रवासी घोडेस्वार परगावी गेल्यामुळे तानसा अभयारण्य आणि प्रचंड जलाशयाला एकट्याने भेट द्यायचे धाडस होईना म्हणून आम्ही वेळेवर पंचक्रोशीतील गणेशपुरी-वज्रेश्वरी-अकलोली हि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध तीर्थस्थळे पाहण्याचे योजिले.
मिसळपाव
.
.
(प्रासंगिक)
सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.
एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.