साद
माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी.
मिसळपाव
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.'
ह्या लेखावरून मी परत गेलो ना...