Skip to main content

बोली आणि भाषा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/10/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

मुंबईकर . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . .

उदय कॉर्लिझम्सचा अंतिम भाग

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 30/09/2017 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मायकलने जस्टिनचा हात धरून त्याला अंगणात आणले. अंगणातील एका लहानश्या कारंज्याशेजारी बसायची सोय होती. महत्वाच्या चर्चेसाठीची मायकलची ही आवडीची जागा होती. काही व्यवसाइकांनी मायकलसाठी पुरवलेले अंगरक्षक वगळता तिथे कुणीही नव्हते. जस्टिनने बोलायला सुरवात केली. " तू एवढा हरामखोर असशील याचा विचार मी कथी केलाच नव्हता. तूला त्या महापुरुषाची जागा घेताना तुझ्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे ठेवायचा नव्हता. त्यासाठी माझ्या आईला मारलस. मला तरी का मागे सोडलस? की मीच तुला महापुरुष आहे यामुळे घाबरलास मला मारायला ?

हे बहुरुपी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 30/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हे बहुरुपी मृत्यो एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज? उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी? की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई? कळत नाही, दोष देऊ कुणा ? या बजबजपुरीचा बकालपणा ? की तुझा निरंतर मायावीपणा ?
काव्यरस

घराकडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती भाग २

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 30/09/2017 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती! भाग २ Asmi@Khed खेड च्या घराच्या पुढील दारी अस्मिचा एक फोटो काढला. तेव्हढ्यात विलास आला ( खेड चे घर साफसुफ ठेवायचे काम गेली ९ वर्षे विलास करतोय) सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अगदी प्राथमिक सुविधा ही कशाबशा सुरु आहेत खेडच्या घरात. तरीही विलास व त्याच्या कुटुंबियांच्या प्रेमादरामुळे खेड चे अल्पसे वास्तव्य सुखावह झाले.

बघ तुला जमतं का ...

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 30/09/2017 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
बघ तुला जमतं का ... तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर किंवा बटाट्याच्या चिप्स साठी मर्जी तुझी... उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल पण एकादशी दुप्पट खाशी हे नेहमी लक्षात ठेव..... तू जिम मध्ये रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी... तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल पण वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला मात्र विसरू नकोस..... तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस युअर विश... पण फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला मात्र विसरू नकोस..... तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये सहभागी हो किंवा नको होऊस हक्क तुझा... पण सोशल मीडियावर लॉग-इन करायला मात्र विसरू नकोस.....

संघर्ष : भाग ०५ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 30/09/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०४ पासून पुढे.. काही वेळानंतर.. (वेळ : संध्याकाळी ६ वा. स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.) सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती. सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं.

तिन्ही सांजा.....

लेखक रुस्तुम यांनी शुक्रवार, 29/09/2017 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो. त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय. 'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी.