Skip to main content

||संत ज्ञानेश्वर ||

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 17/11/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता .

infinity

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/11/2017 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली. सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही. चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश. बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती.

गाज २

लेखक अबोली२१५ यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
गाज१ http://www.misalpav.com/node/41462 विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला. गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली "काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज" "आर !

ग्राम"पंचायत" लागली..!! -7

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 16/11/2017 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . " " म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? " " अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . " " कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली . " काय ते ? मी ऐकलं नाही . " " तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . " " अगं असं का सांग ना काय ते ? " " ते राहू दे, ते मी असाच बोलत होते .

पदार्थधर्मसंग्रह: पदार्थाची सहा अंगे (Padarthsharmsangraha: Six facets of any entity according to Vaisheshika)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी बुधवार, 15/11/2017 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: प्रस्तुत लेखातील संस्कृत श्लोक हे प्रशस्तपादभाष्यातील, इंग्रजी अनुवाद हा महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांच्या इंग्रजी भाषांतरातून घेतला आहे. त्याखाली भावानुवाद केला आहे. नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा व उदाहरण या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत. एखाद्या कॅलिडोस्कोप मधून साध्याच काचेच्या चुऱ्याच्या वेगवेगळ्या सुंदर रचना दिसाव्यात तसेच वैशेषिकांनी पदार्थाकडे पहायचे सहा दृष्टिकोन सांगितले आहेत. त्यांमधून कोणत्याही पदार्थाची सहा अंगे दिसतात. खाली दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून या सहा अंगांविषयी माहिती दिली आहे. ते प्रश्नसुद्धा समजायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.) पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्ये कोणती? प्रशस्तपाद म्हणतात: अथ के द्रव्यादय: पदार्था:, किञ्च तेषां साधर्म्यं विधर्म्यञ्चेति | Question: Which are the categories, substance and the rest? And what are their similarities and dissimilarities? पदार्थातील ती द्रव्ये कोणती? त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा कोणता? वैशेषिक विश्लेषण पद्धतीचा हा पहिला टप्पा. यात पदार्थ कोणत्या द्रव्याचा बनला आहे याचा विचार होतो. तत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति | तद्व्यतिरेकेणान्यस्य संज्ञानभिधानात् || Answer: Among these the substances are – Earth, Water, Light, Air, Ether (Akash), Time, Space, Self and Mind. These mentioned in the sutra by their general as well as specific names, are nine only; as besides these none other is mentioned by name. ती द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(ether), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.

माणूस आणि एकलेपण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/11/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात. माणूस या जगात एकटा असू शकेल का?

चंद्रमण्यांचे पाझर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/11/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल
काव्यरस

हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 15/11/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी.

काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 15/11/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय. भाग १ - आठवड्याचे सात दिवस. भाग २ - अधिकमास आणि क्षयमास. एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात.