प्रेरणा वगैरे
'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....'
असं काही नसतं गं
कारण
तू जवळ असताना
मला कविता लिहावीशी वाटणं
हा तुझा अपमान तरी आहे
.
.
.
किंवा पराभव तरी....
थंडी आली की,माझी आई आहारतल्या मेथीचे प्रमाण वाढवायची.मेथीचे लाडूही केले जायचे,पण मला ते कधीच आवडायचे नाहीत.मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार,मेथी घालून डोसे,घावणे, धिरडी,थालिपीठं बरंच काय काय व्हायचं.त्यातलाच एक चमचमीत पदार्थ म्हणजे मेथी डाळवडे,नाश्त्याला हमखास असायचेच.भरपूर थँडियासायची तेव्हा दिवळीपासूनच.सकाळी पहाते उठून अभ्यासला बसायचो तेही स्वेटर घालून, कं बांधून.
डॉक आणि मी डेक्कन क्लिफहँगर ला जायचं असं बऱ्याच महिन्यांपासून ठरवलं होतं. पुण्यात डॉकचे बरेच सायकलिस्ट मित्र आहेत. डॉकने त्यांना विचारून आमची टीम पक्की केली. माझ्यासाठी गंमत अशी की, त्यांपैकी कुणालाच मी ओळखत नव्हतो आणि भेटण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण त्यांचा व्हॉटस्अॅप ग्रुप जॉईन केल्यावर एकेकाचे पराक्रम कळायला लागले.
आमच्या टीम पैकी एक देशपांडेमामा हा काहीतरी भयंकर प्रकार होता.