Skip to main content

लोकसंस्कृतीचा आदिम नाद (भाग दोन)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/02/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मित्राबरोबर दळवटजवळच्या कोसुर्डे गावाच्या रानखळीवर प्रत्यक्ष कोकणा लोकांच्या डोंगर्‍या देवाच्या भक्‍तांचा अनुभव घेतला. रात्रभर त्यांच्याबरोबर थंडीत थांबलो. त्यांच्या सोबत भुज्या नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ खाल्ला. नागलीची भाकर खाल्ली. कडाक्याच्या थंडीत शेकोटी शेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगर्‍या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारून घेण्याची पध्दत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. शिवार देव, वाघ देव, नागदेव, भूते यांची लोकश्रध्देच्या मुळातून माहिती भक्‍तांकडून काढत होतो.

खग्रास सूर्यग्रहण : अविस्मरणीय अनुभव

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 01/02/2018 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण बघण्याची खरी मजा ही खग्रास सूर्यग्रहणातच येते. मी २४/१०/१९९५ चे ग्रहण पाहिले होते. त्याची काही क्षणचित्रे लिहीत आहे. १.‘खग्रास’ (म्हणजे ९९% अंधार) चा भौगोलिक पट्टा हा मर्यादित असतो. अन्य लांबच्या ठिकाणाहून ते खंडग्रास दिसते. २. म्हणून एकटे जाण्याऐवजी माहितगार चमू बरोबर जावे. युवाशक्तीचे अभ्यासू लोक तारखेच्या आधीच इच्छीत ठिकाणाची पाहणी करून येतात. ३. त्यामुळे आमचे राहण्याचे ठिकाण हे त्या मैदानापासून अगदी जवळचे निवडले होते. ४. जे एकटे दुकटे लोक फत्तेपूर सिक्रीला राहिले होते त्यांना त्या सकाळी हॉटेल पासून जाम एकही वाहन मिळत नव्हते. ग्रहण आपली वेळ कधीही चुकवत नाही !!!

शेजाऱ्याचा डामाडुमा- राय रुफिया आणि ड्रॅगनची मिठी - मालदीव भाग ७

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 01/02/2018 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे ६ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सहावा भाग इथे आहे :- https://www.misalpav.com/node/41819  आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा अगदीच पिटुकला देश. गर्भश्रीमंत सौंदर्यप्रेमी पर्यटक सोडले तर इतर कोणाच्या खिजगिणतीतही नसला तरी आश्चर्य वाटू नये असा. पण तसे नाही. जगाशी आणि जागतिक संस्थांशी मालदीवचा व्यापक संपर्क आहे. शेजारी देश म्हणून भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे निवासी राजदूतावास राजधानी मालेत आहेत.

तिसरी मिती.....

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 01/02/2018 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरी मिती...... प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे. मी ,हा राजेश इनामदार असे करेल असे तरी लोकांनाच काय मला सुध्दा कुठे वाटले होते? एका संस्थानिकांच्या घराण्यात जन्मलेला अगदी बौर्न विथ सिल्वर स्पून! ... ज्या .. पुण्यात मी जन्मलो आणि वाढलो त्या माझ्या लाडक्या पुण्यातून मी पळून गेलो.... हो अगदी शब्दशः पळून गेलो .नंतर किती तरी वर्षे मी दहा बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस येत नव्हतो.मी शिकायला अमेरिकेत गेलो ,तिथेच M.B.A.

चारोळी

लेखक Swapnaa यांनी गुरुवार, 01/02/2018 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी चंद्रप्रकाश चोहीकडे चंचल चांदणे, चंद्रकोर चित्तचोरते चंद्रमा चमचमते.. कवी - स्वप्ना
काव्यरस

द्वा सुपर्णा

लेखक शरद यांनी गुरुवार, 01/02/2018 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
द्वा सुपर्णा ब्रह्म (परमात्मा) व प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा यांचे एकमेकाशी असलेले संबंध काय ? हा भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो. ब्रह्म एकमेवाद्वितीय तर प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा तर विविध रुपात दिसतो. यातील संबंधांचा उकल करण्याचा प्रयत्न ऋग्वेदापासून झालेला दिसतो. पुढे उपनिषदांमध्ये याचा विस्तार झाला. {मनुस्मृतीवरील लेखावरून असे दिसते की काही वाचकांना संस्कृत श्लोक पाहिजे असतात. (देव या सुसंस्कृतांचे भले करो!) मी आज संस्कृत श्लोक देणार आहे. माझ्यापर्यंत पोचलेला अर्थही देत आहे.

सैल नसू दे मिठी जराही!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 01/02/2018 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
अंगांगाची झाली लाही... सैल नसू दे मिठी जराही! मेघामाजी उनाड तडिता तू सागर मी अवखळ सरिता मला वाहू दे तुझ्या प्रवाही... सैल नसू दे मिठी जराही! पदरामधुनी लबाड वारा घिरट्या घालत फिरे भरारा गंध तनुचा दिशांत दाही... सैल नसू दे मिठी जराही!

ऑस्ट्रेलियन ओपन चा अंतिम सामना आणि शैलीदार फेडरर...

लेखक ss_sameer यांनी बुधवार, 31/01/2018 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसे कायम चिरतरुण राहावीत अन त्यांच्या कलाकृती सतत येत राहाव्यात अस वाटत राहतं. ज्यांचं मन चिरतरुण असत अशा रसिकांची ही भावना देखील तितकीच चिरतरुण. ऑस्ट्रेलियन ओपन चा २०१८ चा अंतिम सामना संपल्यावर रडणारा फेडरर पाहून ही रसिक मंडळी अशीच पुटपुटली. सर्वकालीन महान खेळाडूंत ज्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर राहील आणि शेवटपर्यंत लोकप्रियतेच्या शिगेला असलेला हा खेळाडू. वयामुळे खेळाला मर्यादा येतात खऱ्या. जुन्यांनी ते ओळखून नव्यांना संधी द्याव्यात. परंतु ही व्याख्या सांघिक खेळाची. वैयक्तिक खेळात निवृत्तीचे वय जो तो ठरवतो.

सौर उर्जा आणि काही शंका

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 31/01/2018 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. <टाइम प्लीज> ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी https://www.misalpav.com/node/41559 इथे व्यक्त व्हावे. </टाइम प्लीज> फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. वापरण्यापूर्वी काही तास ती चार्ज करावी लागते.

सैल असावी मिठी जराशी...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 31/01/2018 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
सैल असावी मिठी जराशी, हळूच वळुनी तुला बघाया, अर्ध्या मिटल्या तव नयनांचे, ओले हळवे चुंबन घ्याया.. रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम आखीव रेखीव, घटद्वयांना व्यर्थ लपवती... जरा विसावून सिंहकटीवर, मधूर मादक श्वास फुलावे, अधीर कोडे या विश्वाचे, गहि-या डोही उकलून यावे.. पहाटवारा लगबग करतो, घेऊन येतो थोडे केशर, स्वर्णीम करतो शर्मिल गाला, तलम तृप्तीचे शिंपून अत्तर.. ( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)
काव्यरस