बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!
जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही.
मिसळपाव