Skip to main content

"अथातो घाटजिज्ञासा" - भाग २ रा

लेखक दिलीप वाटवे यांनी मंगळवार, 29/05/2018 23:29 या दिवशी प्रकाशित केले.

'घाटवाटा म्हणजे काय'?

शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना 'सह्याद्री आपले सामर्थ्य आणि आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे' हे महाराजांनी पुर्णपणे ओळखलं होतं हे जाणवतं. तसं पहायला गेलं तर शिवकाळात मराठ्यांची मनुष्यबळ, युद्धसामग्री आणि आर्थिक बाजू अतिशय कमकुवत होती. पण केवळ याच सह्याद्रीच्या मदतीने त्यांनी आखलेले आपले डावपेच पुर्णत्वास नेले. त्या वेळचं मराठ्यांचं सैन्य म्हणजे समाजातील सामान्यातलं सामान्य घटक होतं.

बाप ….

लेखक मनिष यांनी मंगळवार, 29/05/2018 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या बापांसारखेच, आपल्या बापालाही काही कळत नाही याची खात्री पटल्यानंतर… मला ह्याच शाळेत का घातलं? फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं? असे आरोप केल्यानंतर… बाप आहे ना, तो चुकतोच. आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच हे समजून चुकल्यानंतर… मग तू स्वतः बाप झाल्यावर, वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर प्रेमाने जवळ घेतल्यानंतर… कधीतरी आठवेल का तुला लहानपणी तू शांत झोपल्यावर, कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत, हळूच तुझी पापी घेऊन, तुला एकटक पहात असतांना भरून आलेले माझे डोळे. माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात, माझ्या हळव्या आठवणीने मी नसल्यानंतर? ~ मनिष (28/5/2018)

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 29/05/2018 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आंब्याच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता.

पिंपळपान

लेखक कहर यांनी मंगळवार, 29/05/2018 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू मग फुलांनी केलेला अपमान शोधू दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची अन्यथा रामायणात अज्ञान शोधू सोसेना गलका सभोवती शांततेचा दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू बोलण्या आधीच सुरू होती लढाया ऐकूनी घेतील असले कान शोधू प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू आदेश हा कारागृहे खुली करण्याचा पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले नशिबातील एखादे समाधान शोधू खंत नको कालची वा तमा उद्याची खुल्या बाहूंनी जगू..
काव्यरस

स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/05/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे. १९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते.

नेदरलँड्सची सफर भाग -२

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 28/05/2018 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर भाग -२ मुळात युरोप पाहायचा तर सहा दिवसात पाच देश किंवा १० दिवसात दहा देश असे करणे मला पटत नाही. कारण सहा दिवसात महाराष्ट्रसुद्धा बघून होणे अशक्य आहे. अर्थात बरेच लोक केसरी वीणा सारख्या ट्रॅव्हल सर्व्हीसने जाणे पसंत करतात आणि तसे करण्याची कारणे आहेत आणि आपल्या ठिकाणी ती बरोबरही असतील. एक तर जाण्यायेण्याचा खर्च आणि पासपोर्ट व्हिसा ची आणि लांब विमान प्रवासाची कटकट परत परत नको. दुसरे म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. विशेषतः शाकाहारी लोकांचे. शिवाय जिकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळापर्यंत बसने नेले आणि आणले जाते. पण मला ते पटत नव्हते हे खरं.

सामान्य माणसाचा सिनेमा

लेखक मकरंद घोडके यांनी सोमवार, 28/05/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा म्हटलं की सगळं कसं वेगळ्याच दुनियेतलं दिसू लागतं आणि आपण त्यात रमून जातो. काही निखळ मनोरंजन म्हणून तर काहीजण स्वतःला रिलेट करता आलं त्यातून म्हणून तर काहीजण सोशल रिऍकशन म्हणून या माध्यमाकडे आकर्षित होत असतात. पण मेड फॉर इच आदर, पराकोटीचा संघर्ष , कुणीतरी शोधलेली वेगळी वाट,शॉकिंग/ सुखासीन/दुःखदायक द एन्ड च्या संकल्पना या खरंतर फक्त सिनेमा साठीच योग्य आहेत अशी माझी ठाम समजूत होऊ लागली आहे. दोन तासात ज्या गोष्टीचा उरक उरकायचा आहे त्यातल्या घटना कशा धारदार टोकदार आणि वेगवान असतात.

गणु अन गणूची मनू

लेखक खिलजि यांनी सोमवार, 28/05/2018 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
गणु अन गणूची मनू लय भारी गणू गोत्यात येई मनू जाता माहेरी मनू जाता येई मंजिरी गणूची मंजिरी मनू सारी गणू नाही पाहिला गणू नाही राहिला गणूची येगळीच दुनियादारी कधी मनू तर कधी मंजिरी असे हजर सदैव दारी गणु मग्न तो गणु भग्न तो गणु हासतो गणु नाचतो मनातल्या मनात गणु धावतो गणु पडतो गणु चालतो कधी खेळतो आतल्या आत गणूची यातना भेदे मना खेळ रंगला खेळ भंगला गणू संपला पंचतत्त्वात सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस