Skip to main content

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 23/08/2018 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

मुक्त मी !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 23/08/2018 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वयाच्या साठाव्या वर्षी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि बॉम्बच पडला सगळ्या घरात !नवरा-बायको म्हणून पटत नव्हतंच कधी., ते सारे ओढून ताणून चाललंय हे तर जगजाहीर होते. पण एकदम घटस्फोट? इतकी वर्ष एकत्र काढल्यावर हा असा विचित्र निर्णय घेण्याचं कारण काय? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला. इतकी वर्ष जमवून घेतलं ना त्याच्याशी ? मग आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्याला एकमेकांची ,एका साथीदाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा आता हे असं वेगळं राहून काय मिळवणार आहेस तू ? आणि प्रमोद चा काही विचार करशील की नाही? नातवंडं, मुलं ,सुना ,नातेवाईक मंडळी, समाज, बापरे किती लोक? इतक्या सगळ्यांना समजवायचं ...

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

ठाणे कट्टा २५ ऑगस्ट

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 23/08/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमंत्रणपत्रिका बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे. बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे. तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.

परभणी भटकंती - कशी नि कुठे ?

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 22/08/2018 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ... १. दिवसाची धावती भेट परभणी येथे कामानिमित्त होणार आहे . औंढा नागनाथ नि परळी वैजनाथ दर्शनाचा बेत आहे . १ला चलो रे असल्याने भटकंतीचे बंधन नाही . कृपया कोणी अजून स्थळे वा ट्रॅव्हल प्लॅन सुचवल्यास मदतच होईल. थँक्स इन ऍडव्हान्स .....

पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 21/08/2018 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
(नवीन वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी आधी ‘सोडियम’ वरचा लेख जरूर वाचावा: https://www.misalpav.com/node/43167). * * * सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे.

मी पाहिलेले दशावतारी नाटक!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 21/08/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात. मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो.

परग्रहावरील प्रेम रहस्यकथा भाग २

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 21/08/2018 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती ., क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले . अरे मयूर या माणसाजवळ थांबणे धोक्याचे आहे आपल्याला इथून निघून जाणेच योग्य ठरेल . असे बोलत ते निघाले ,.आपण पुढच्या वेळेस पूर्ण तयारीत या ग्रहावर येऊ खूप वेळ प्रवास केल्यावर ते एकदाचे आपल्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले .

शतशब्द कथा: हडताल

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 21/08/2018 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
शर्माजी एका फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील. दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- नेताजी.

मोबाइल - होल्डर ( D I Y )

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 21/08/2018 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
*********************** कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा ************************ मोबाइल हँडल ( DIY ) रेल्वेतून अथवा गर्दीत किंवा ट्रेकिंगमध्ये मोबाइलने फोटो,व्हिडिओ काढताना तो हातातून निसटू नये म्हणून केलेले हँडल. बाजारात मिळणारे प्लास्टिक कवर - त्यालाच दोरी बांधायची. फोटोसाठी "Easy Selfie free" हे कॅम्रा अॅप वापरायचं. आवाज करून शटर चालू करता येतो. फोकसिंग होऊनच फोटो निघतो. जिथे सेल्फि स्टिक वापरता येत नाही अथवा जवळ नसते तेव्हाही उपयोगी.