मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाणे कट्टा २५ ऑगस्ट

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमंत्रणपत्रिका बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे. बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे. तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती. https://www.google.co.in/maps/dir/''/malvan+tadka+thane/@19.1968751,72.8919969,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x3be7b9d2d4f56bed:0x4f96ca1879360691!2m2!1d72.9620374!2d19.1968884

वाचने 24705 वाचनखूण प्रतिक्रिया 70

टर्मीनेटर गुरुवार, 08/23/2018 - 13:20
कट्ट्याला शुभेच्छा. उपस्थित राहायला नक्की आवडले असते परंतु २५-२६ ऑगस्ट ला रक्षाबंधन निमित्त पुण्याला जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ह्यावेळी शक्य होणार नाही. वरती डॉक्टर म्हणाल्या प्रमाणे सचित्र कट्टावर्णनाची प्रतिक्षा आहे.

नंदन गुरुवार, 08/23/2018 - 14:49
कट्ट्याला अनेक शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येऊ द्या! (सहाएक वर्षांपूर्वी पॉप टेट्समध्ये गवि, रामदासकाका, सर्वसाक्षी, प्रभूमास्तर, वरुण मोहिते, विमे, स्पा, किसन, विजुभाऊ, जयपाल, क्लिंटन इत्यादी महारथींसोबत जमलेल्या धमाल कट्ट्याच्या आठवणी या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या)

सतिश पाटील गुरुवार, 08/23/2018 - 15:00
मिपावर मोजक्या प्रतिक्रिया आणि 2-4लेख याव्यतिरिक्त माझं काही योगदान नाही, तसेच मी कुणाला व्यक्तिशः ओळखतही नाही. त्यामुळे मी आलो तर चालेल का ? नाहीतर उगाच बेगानी शादी मे अब्दुल्लाह दिवाना असं व्हायला नको. बादवे काय काय असतं कट्टा म्हणजे ?

In reply to by सतिश पाटील

सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 18:03
@सतिश पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत आहे. कोणताही कट्टा केला तरी त्यात दर वेळेस काही लोक अनोळखी असतातच. पण आपोआप कशी मैत्री होते ते पहा.

गवि गुरुवार, 08/23/2018 - 18:14
उत्तम. बाकी अन्य मांसाहारी/शाकाहारी मिक्स हॉटेलांत सर्वांचं एकत्र चालून जातं पण सीफूड स्पेशल हॉटेलमध्ये माश्याचे पदार्थ चिकनपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने हवेत गंध जास्त तीव्र आणि मुरलेला असतो जो शुद्ध शाकाहारी लोकांना त्रासाचा होतो असा अनुभव आहे. खुद्द अतिमत्स्यप्रेमी असूनही शक्यतो व्हेज लोकांना सोबत घेऊन मासळी फेम हॉटेल्समध्ये जाणं टाळतो. या मुद्द्याचा विचार व्हावा.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 21:16
चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली आहे (जेंव्हा बऱ्याच लोकांना मोकळा वेळ मिळतो) म्हणून आणि जेथे जागा भरपूर उपलब्ध आहे आणि जेथे जेवण चविष्ट आहे असे एकंदर अभिप्राय आहेत असे ठिकाण म्हणून याची निवड केलेली आहे. याचा अर्थ सर्वंनुमतें ती बदलता येणार नाही असे नाहीच. याला चांगला पर्याय असेल तर जागा बदलता येईल. चांगले पर्याय सुचवल्या आभारी आहोत. मूळ हेतू लोकांना भेटणे आणि सुग्रास भोजन हा आहे. जागा महत्त्वाची नाही __/\__

In reply to by सुबोध खरे

गवि Fri, 08/24/2018 - 07:10
तुम्हाला तर माहीत आहे, मासेप्रेमी लोक एकत्र आले की हेमंतसारख्या ठिकाणीही इन्स्टंट कट्टा भरतो आणि एन्जॉयही फुलटू होतो. ठिकाण उत्कृष्ट असेलच. ते मनापासून निवडलेलं असल्याने ते बदलण्याने नक्कीच विरस होऊ शकतो. पण योगायोगाने मजभोवती शाकाहारी लोक जास्त असल्यामुळे पूर्वी अशाच कट्ट्याचा अनुभव आणि अन्य काही मत्स्यआहारी हॉटेलांत भेट झाल्यावर पूर्णवेळ नाकाला रुमाल लावून अंकम्फर्टेबल होणं पाहिलं. एकदोघांनी स्पष्ट तसं बोलून दाखवलं. त्यांचा खुद्द काही शाकाहारी खाण्याचा उत्साह त्या वासात बसून मावळला. त्यातच खेकडा, शेवंड वगैरे मागावलेल्यांची फोडाफोडी, कवचाचे तुकडे , कड कड आवाज याने ते आणखीन अस्वस्थ होत होते. मिश्र ग्रुप असताना असं होऊ नये इतकाच उद्देश सुचवणीमागे आहे. शिवाय फिक्स कॉस्ट ठिकाण मिळाल्यास कट्ट्याला अजून चांगलं. (एकाच दरात अनलिमिटेड थाळी, बुफे, एन्ट्री बेस्ड जेवण (व्हिलेज, विष्णुजी इत्यादि इत्यादि)

In reply to by गवि

मीपाकरांचे मागील काही कट्टे आयोजित / उपस्थित राहिलयवर एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे शाकाहारी लोक जास्त असतात त्यातून श्रावण चालू आहे , ठिकाण बदलण्याचा विचार व्हावा , पुन्हा पोप टेट्स किवा मॉल मधीलफूड कोर्टचा विचार व्हावा , पार्किंग समस्या येत नाही (इतर कामे पण होतात :) ) अर्थात तुम्ही कट्टा आयोजित करत आहात म्हणजे तुम्हीच सर्वेसर्वा आहात :)

In reply to by गवि

सुबोध खरे Fri, 08/24/2018 - 09:36
घोडबंदर रोड हे लोकांना जाण्यायेण्यासाठी फार अडचणीचे होते. यास्तव ठाणे शहर/ स्टेशनपासून रिक्षाने जाण्याच्या अंतरात जेथे शनिवारी संध्याकाळी अर्धा पाऊण तास रस्त्यावर न थांबता जागा मिळेल असे एखादे थाळी किंवा तत्सम रेस्टोरंट असेल तर त्याला आमची कुणाचीच हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

"मालवण" तडका म्हणजे चांगलंच असणार.:) बाकी शाकाहारी , अतिशय चविष्ट , नेहमीपेक्षा जरा वेगळे पदार्थ, किंमती जास्त महाग नाहीत आणि सहसा ८ वाजेपर्यंत आरामात जागा मिळणारं अजून एक हाॅटेल म्हणजे मानपाड्याचं 27यार्डस. कट्ट्याला सुरवातीला थोडा वेळ यायचा मानस आहे. 8.15 पर्यंत निघावं लागेल. त्याआधी कोणीतरी तर असेल ना?

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Sat, 08/25/2018 - 18:19
जोरात कट्टा करा डॉक, होऊद्या फुल्ल एंजॉयमेन्ट. तुमच्या ऑफरबद्दल थ्यांक्स अ लॉट पण भेटू परत कधीतरी. सध्या नाही शक्य. :( जमल्यास माझ्यावतीने टक्याच्या पाठीत एक जोरदार बुक्का हाणा. लै दिवस पेंडींग आहे. मोहित्यांना पण नमस्ते सांगा.

अभ्या.. गुरुवार, 08/23/2018 - 21:20
कट्ट्यास शुभेच्छा. . पाताळेश्वर परत एकदा गजबजवण्याचे मा. एक्काकाकांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती. . (आता कट्टाच्या ठिकाणी माझा मी येऊ शकतो ह्याची सर्व पुणेकरांनी नोंद घ्यावी हि विनम्र विनंती.)

In reply to by अभ्या..

नाखु गुरुवार, 08/23/2018 - 22:34
अभ्या पुण्यात कट्ट्याला येणारे म्हणजे भारीच कि, पिंपरी-चिंचवड कर हैस ना मग ठेवू पिंपळे सौदागर नायतर प्राधिकरणात!!

In reply to by यशोधरा

नाखु Fri, 08/24/2018 - 20:21
मनोरंजन,विरेचन,विवेचन आणि प्रवचन करण्यासाठी अवकाश मिळावा या उद्दात्त हेतुनेच पुणे कट्टा साठी दोन तीन धागे प्रयोजन असते याची नोंद घ्यावी ही विनंती!!! सदस्य अखिल पुणे महानगर मिपाकर गाठभेट क्षेमकुशल संघ

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Fri, 08/24/2018 - 10:21
मी पुणेकर नसलो तरी उद्या पुण्याला येणार आहे. एवढ्या शॉर्ट नोटीस वर आणखीन कोणाला जमणार असेल तर ठरवा उद्या संध्याकाळी. पुणे भेट सार्थकी लागेल.

In reply to by अभ्या..

आता तुम्ही पुण्यात उपलब्ध आहात तर, नव्या रक्ताला वाव देऊ इच्छितो. घ्या पुढाकार आणि करा जाहीर जागा व वेळ जाहीर... मिपाकर नेहमीप्रमाणे येतीलच !

In reply to by सतिश गावडे

नाखु Sat, 08/25/2018 - 17:21
असलेल्या अज्ञात मिपाकरांना ,काही आंतरराष्ट्रीय, सामाजिक, वैश्विक आणि भाषाबंधन प्रतिबंध व सांकेतिक राजशिष्टाचार यामुळे प्रकट पणे संपर्क करु शकत नाहीत याची नोंद घ्यावी ही विनंती. ते आपल्या समोर कुठल्याही रुपाने प्रकट होतीलच याबाबत उत्सुकता आम्हालाही आहे नाखु पांढरपेशा मिपाकर

ज्योति अळवणी Sat, 08/25/2018 - 21:50
मनापासून शुभेच्छा... ठाणे फारच लांब आहे.... चर्चगेट ते बोरिवली भागात कधीतरी कट्टा ठरला तर नक्की आवडेल. सर्व मिपाकराना भेटायची इच्छा आहे.... सचित्र अनुभवाची वाट पाहते आहे

कंजूस Sun, 08/26/2018 - 00:02
ठाणे कट्टा १) मुवि आणि मी फारच लवकर जागेवर पोहोचलो. सहा वाजता. बस स्टॅापला टाइमपास. ठाणे टिएमटीच्या बसेस पाहत एक तास काढला. २) पिंगू, मुवि , श्री ( आइडी - जीवना) व सौ पाडगावकर. ३) पिंगू, मुवि, सुबोध खरे. मागे बिल्डिंगच्या गच्चीवर नारळी पौर्णिमेचा चंद्र. मी साडेआठला लवकर निघालो. हॅाटेल चांगले आहे. गप्पांचा खास असा विषय नव्हता. तरुण मिपाकर मंडळी मला चालवतात हे समजून बरे वाटले. ४) सुबोध खरे, गामा पैलवान ( आपला नम्र इत्यादि), वरुण मोहिते, सुहास झेले आणि वरुणचा मित्र. ५) आठपर्यंत दहा मिपाकर आले.

इरसाल Mon, 08/27/2018 - 16:16
दोन चंद्र आणी डॉ. खरे कॉम्प्लेक्स देत आहेत. (बर्‍याच दिवसांनी मुविंचे दर्शन झाले, मुवि ह. घ्या.)

ज्योति अळवणी Sat, 09/01/2018 - 02:29
खर तर कोणत्याही मिपाकरांना मी वयक्तिक ओळखत नाही. त्यामुळे ठाणे किंवा पुणे लांब वाटते. कधीतरी सर्वांना भेटायला आवडेल. खरच वेस्टर्न बाजूला जे मिपाकर आहेत आणि एकमेकांना ओळखतात त्यांनी ठरवावे. भेटायला खूप आवडेल

गामा पैलवान Sat, 07/27/2019 - 02:29
वरुण मोहिते पाटलांनी हा कट्टा आयोजित केरण्यात बराच पुढाकार घेतला होता. त्यांनी खाण्याचा एक पैसाही घेतला नव्हता. मी पीत नसल्याने पिण्याबाबत माहीत नाही. वरुण मोहिते पाटलांनी नुकताच इहलोकाचा निरोप घेतला. त्यावरनं हा कट्टा आठवला. त्यांना श्रद्धांजली. -गामा पैलवान