Skip to main content

दारू ही केवळ निमित्तमात्र..

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 29/03/2019 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता? आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !! मग पुढे असं होतं की .. मैत्री मधलं अंतर वाढत जातं. गळा भेटी कमी होत जातात. कट्टे, दंगे मागे पडत जातात.. पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला.. आणि जुने दिवस लागतात आठवायला.. मैत्र लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून बसायचं.. दारू ही केवळ निमित्तमात्र..

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/03/2019 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
३: मंद गतीने पुढे जाताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 28/03/2019 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
15.03.2019 नॉर्मली पाठ टेकली की पाच मिनिटात झोप लागते. पण काल तसं नव्हतं झालं. आजचा प्रवास याही आधी सायकलने केलेला होता पण उद्याचा प्रवास जिथे व्हायचा तो पहिल्यांदाच. म्हणजे बाईक किंवा कार ने जरी तिकडे गेलेलो असली तरी सायकल प्रवास हाच पहिला. म्हणून ती दृश्य अर्धवटपणे नजरेपुढे येत होती. सकाळी पहिल्या गजरात जाग आली आणि भराभर आवरून सव्वासहा ला बाहेर पडलो. मुक्काम पेठेत असल्याने गावाबाहेर पडून हायवे वर येईतो 7 km झाले. मग आता प्रवास सुरु हा फील यावा यासाठी केवळ एका शेकोटी लावलेल्या ठेल्यावर चहा घेतला. इथून पुढे 15एक km कात्रज टनेल्स. हे अंतर त्रासदायक होणार होतं. आणि तसं ते झालं ही.

डॉक्टर हा निमित्तमात्र..

लेखक सोन्या बागलाणकर यांनी गुरुवार, 28/03/2019 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र.. (मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून) मग पुढे असं होतं की .. दातामधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधला नंबर वाढत जातो. बोळक्यामधलं हसू निवत जातं... नावं होतात विसरायला.. आणि घरचे लागतात रागवायला.. फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. डॉक्टर हा निमित्तमात्र..

चव

लेखक anandkale यांनी गुरुवार, 28/03/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोसायटीत बरीच भटकी मांजरे होती. शाळा सुटल्यावर आलेली मुले त्या मांजरांना खाऊ घाल, त्यांच्या अंगावरून हात फिरव वगैरे खेळ करीत. तसे बघितले तर सर्वच मांजरे लावारीस नव्हती. गुंड्या बोका चिपळूणकरांनी घरात उंदीर झाले म्हणून पाळला होता. पण पट्ठ्याने उंदरांना कधीच तोंड लावले नाही. त्याला पाहून कधी कुठला उंदीर जीव वाचवायला पळून गेलाय असे हि सहसा कुणाच्या दृष्टीस पडले नाही. "गेल्या जन्मी उंदीर होता वाटतं, मेला एक उंदीर धरेल तर शपथ" असे चिपळी (उर्फ मिसेस चिपळूणकर) कधी कधी करवादायची. कोपऱ्यावरच्या इराण्याकडे जातिवंत अल्सेशिअन कुत्रा होता.

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

लेखक राघव यांनी बुधवार, 27/03/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं..
काव्यरस

सहा दिवस सायकल भ्रमंती: भाग 1: बदलापूर ते पुणे

लेखक अन्या बुद्धे यांनी बुधवार, 27/03/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
१४-०३-२०१९ सकाळी 5:15लाच गजराशिवायच जाग आली. झपाझप आवरून 5:45ला घर सोडलं. स्टेशनवर माझं आणि सखीचं तिकीट काढलं आणि फलाटावर आलो. कर्जत पर्यंत रस्ता खराब असल्याने ट्रेनने खोपोली गाठायचं ठरवलं होतं. सुरवातच वैतागाची नको. 6:10 ला ट्रेन आली. लगेज डब्बा खच्चून भरलेला! धावत पळत नॉर्मल डबा गाठला. रिकामाच होता. 5-7 जण तर आडवे पडून घोरत होते. सखीला शेजारी उभी करून दरवाज्याजवळ बसलो. एकेक स्टेशन मागे पडत होतं आणि वातावरण उजळत होतं. कर्जत अलीकडे यथावकाश रखडून 7:20 नन्तर खोपोलीत उतरलो. आत्ताशी सूर्य वर येत होता आणि हवेत मस्त गारवा. हायवेला आल्यावर लगेच वेग घेतला. सखी मस्त पळत होती.

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी

लेखक प्रशांत यांनी मंगळवार, 26/03/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - १ पुणे ते कराड दिनांक १५ डिसेंबर शनिवार संध्याकाळी साधारण सात वाजता हॉटेल पंकज कराडला पोहोचलो. सायकली नीट लॉक करून रूम मध्ये पोहोचलो, तोच गुरुजींचा आदेश आला "पोरांनो आधी स्ट्रेचिंग करूया नंतर अंघोळ करून जेवायला जाऊ" तेवढ्यात सिद्धू पाटलांचा फोन आला "मी कराड पासुन पाच किलोमीटर अंतरावर आहे, ऍसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे BRM (ब्रह्म) क्विट करण्याचा निर्णय घेतोय. मी येतो तोवर माझ्यासाठी रूम बुक करा" आम्ही सिद्धूची वाट पाहत असताना शैलेशला घरून फोन आला.

काॅफी ही निमित्तमात्र..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 26/03/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..
काव्यरस