Skip to main content

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

कथा – लंचटाईम

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 13/04/2019 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कथा – लंचटाईम ----------------------------------------------------------------------------------------------------------------- दुपारची वेळ झाली की भूक लागते ... काहीतरी पोटात ढकलावं लागतंच . माझं आणि दिग्याचं जेवण झालं होतं . डबा आवरून ठेवत होतो , तेव्हा दिग्या म्हणाला , “ चल बिडी मारून येऊ “ . इंजिनीरिंगची परीक्षा जवळ आली होती . जशी जशी परीक्षा जवळ येऊ लागते तसं येड्यावानी व्हायला लागतं . उन्हाळ्याचे दिवस . पारा वर - वर चढलेला . नकोशी वाटणारी गर्मी . वातावरणात अस्वस्थ करून टाकणारी तलखी . आम्ही दोघे कॉट बेसिस वर राहतो . कॉलेज चालू असताना रुटीन वेगळं असतं . आता कॉलेज बंद .

ताडोबा - वाघांच्या राज्यात

लेखक व्लॉगर पाटील यांनी शनिवार, 13/04/2019 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या पावलांच्या खुणा शोधत आम्ही त्याच्या मागावर होतो... आणि अचानक जणू जंगल जागे झाले..पक्षी प्राणी ओरडू लागले.... आमच्या समोर साक्षात जंगलचा राजा उभा होता... भारताचा राष्ट्रीय प्राणी असे त्याला का मानतात हे त्याला समोर आणि जंगलात बघूनच कळले....सौंदर्य,सामर्थ्य,ताकद,निर्भीडपणा याचा अनोखा मिलाप म्हणजे वाघ...माणसाने एक गोष्ट नक्की शिकावी.. एक तर राजसारखे निर्भीडपणे जगावे किंवा कोण राजा आहे याचा फरक पडू न देता स्वतःच्या हिमतीवर राजसारखं जगावं.... वाघ बघावा तर जंगलात...त्याच्या साम्राज्यात...पण त्याच्या नादाला न लागता.. सादर करत आहे ताडोबा सफारी चा खतरनाक अनूभव...

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ५

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 13/04/2019 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते.

अश्रू

लेखक प्रणया यांनी शुक्रवार, 12/04/2019 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांमधुनी काय निखळले अश्रू होऊनी सुरुवात जाहली सांडायला काय भावना होत्या त्या, त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी रूळली अधरांवरती काही, काही ओघळली गाली काय मोल त्या आसवांना , ते तर फक्त खारट पाणी असो विरह कि सुखाची मिठी एकसारखे थेंब मग ओळखावी कशी चव वेगवेगळ्या भावनांची कोणी..... - प्रणया

झिम झिम झिम्मड झिम्माड

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 12/04/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात आज काय पानोळ्या पानोल्या, आल्या खेळुन करवल्या पाने मांडीता मांडीता, साखर सांडून त्या गेल्या. एक करवली हरवली , कोणी नाही देखीली. तीची उरली सावली, माया सारी सम्पली. आई बापाची पोर ती . नवर्‍याने चोरीली. एक फुल चिमुकले. सासूरवाशीन झाले. लगनाच्या होमात. बाळपणी करपले. झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात.... आज काय खेळू संसारी? कवड्या टाकेन चारी. एक कवडी उलटली, माझी पाटी फुटली. पाटी जशी फुटली, टचकन माया आटली.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ४

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 12/04/2019 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 भाग ३: http://www.misalpav.com/node/44375 दिल्ली शहरांत घुसण्याकरता शहराचे दरवाजे किंवा तट उध्वस्त होऊन शहरांत घुसता येण्याइतके खिंडार पडल्यावर लगेचच पुरेसे सैनिकदेखील त्या खिंडारांतून घुसण्याकरता तयार असायला हवे होते.