Skip to main content

(बंद डब्याच्या झाकणाआडची कोशिंबीर)

लेखक शब्दसखी यांनी शनिवार, 27/04/2019 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-) बाकी शिवकन्या तुमचे आभार!!) सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर... किती बाहेर?? टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे .... ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात डाएटच्या नादात भरली होती तिला डब्यात.... करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी... घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे.... सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे... कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही.. त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...
काव्यरस

तुफान आलंया

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी शनिवार, 27/04/2019 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली होती . मकरसंक्रांतीनंतर तिळातिळाने दिवस वाढत चालला होता . सकाळी प्रसन्न वाटणारे वातावरण ८ नंतर उष्ण जाणवत होते . हळूहळू उन्हाने डोकं वर काढायला सुरुवात केली होती . माणसे घराबाहेर पडताना छत्री टोप्या स्वतःजवळ बाळगत होते जो तो उन्हापासून बचावासून सगळे उपाय करत होता . दुपारी तर घराबाहेर पडणे अवघड झाले होते महत्वाचे काम असेल तरच ती व्यक्ती घराबाहेर पडत असे . बाहेर लिंबू सरबत , पन्हे , कोकम सरबत , उसाचा रस यांचे स्टॉल जागोजागी लागले होते . शहरात हि परिस्थिती होती पण गावात ? गावात मात्र याच्या विपरीत परिस्थिती आहे .

विचार मन्थन

लेखक sunil bhat यांनी शुक्रवार, 26/04/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता सर्वसमावेशक रोजगार निर्मिती, राष्ट्रवाद :सगळ्यांची एक ओळख, आणि उत्पादकता सुधारणे हि भारत सरकार साठी तीन मोठी आव्हाने आहेत सर्व उपलब्ध संसाधनांपैकी कमीत कमी खर्च मध्ये उत्पादकता सुधारली जाऊ शकते हे जपान ने गेल्या शतकात सर्व जगाला दाखऊन दिले। जपानने गेल्या शतकात वेगवान उद्योगिकरणं सुरु केले तेंव्हा मर्यादित संसाधने वापरून गुणवत्ता व्यवस्थापनाची पद्धती लागू करून भांडवल योग्य प्रकारे वापरून खूप यश सांपदले । त्याची कारखान्याची रचना एकाद्या घरा प्रमाणे केली ज्याप्रकारे आपण आपले घर राखतो त्या प्रमाणे तेथील लोक कारखान्या मध्ये काम करतात। त्याम

(दाराआडचा यजमान)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 26/04/2019 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो किती बाहेर? दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा .... असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ? येत असेल का तो ही आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे? यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... (पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते) मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...

धर्म, विज्ञान आणि दुय्यम सत्ये

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 26/04/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या. शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आहे. (इथे कोणताही विशिष्ट धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही संकल्पना असं म्हणायचं आहे.) असं मला का वाटतं याकडे नन्तर येतो.

माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 26/04/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे मित्र बनून येतात सदैव गाती मैत्रीचे गोडवे तोंडात जणू साखर ठेवतात, काही महिन्यांमध्येच एक जीवघेणी कळ देऊन पाठीत वार करून जातात ... माणसे मित्र बनून येतात मनातलं बाहेर काढून केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन दिवसभर कानाशी बसतात आपली लागताना खोलून मैत्रीच्या अंधारात पुन्हा गुडूप होतात...... माणसे मित्र बनून येतात...

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

काकूंच्या क्लिनरची करामत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 24/04/2019 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
काकूंच्या क्लिनरची करामत --------------------------------------------------------------------------------------- एकेक दिवस काय बोअर असतो ना !.... आज रविवार होता. सुट्टीच्या दिवशी सकाळी काय करावं कळतच नाही. मला पोहे खायचे नव्हते. त्यासाठी आईची बोलणी मात्र खाल्ली होती. मला अभ्यास करायचा नव्हता. कार्टून्स बघायची नव्हती. अंगणात नुसतं उभं तरी किती वेळ राहायचं ? खरं म्हणजे- मिनी अजून बाहेर आली नव्हती. घरात बसून काय करत असते, कोणास ठाऊक.

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी बुधवार, 24/04/2019 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात .

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन १९९१ च्या आर्थिक सुधारणा आणि रुप्याचे अवमूल्यन याने , अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. प्राव्हेट कंपन्या भारतात येऊ लागल्या, रोजगार वाढू लागले, नोकरपेक्षा वर्ग कडे हळू हळू पैसे येऊ लागला. त्याकाळी मध्यम वर्ग गावाला जाऊन समाधानी असायचा, आता थोडी मोठी स्वप्ने बघू लागला. नवरा बायको दोघेही कमावते होते, मुले उच्चशिक्षण घायला लागली, काही भुर्रकन अमेरिकेत उडून गेली.