Skip to main content

प्रार्थना!

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 07/05/2019 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता । चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।। हासता यावे मला पाहून इतरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। ~ मनमेघ

उम्फ वर्ल्ड

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 07/05/2019 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
उम्फ वर्ल्ड डेविड इंगलमन या शास्त्रज्ञाचा एक टॉक ऐकला. एकदम भारी. डोक्याच्या पलीकडे! म्हटलं तर कल्पना अगदी साधी आणि सरळ. पण ती वाढवणे प्रत्यक्षात आणणे खरंच भन्नाट आहे. या जगाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा! आपल्या मेंदूच्या क्षमताच आपलं जग केवढं हे ठरवत असतात. नुसतं केवढं हेच नव्हे तर त्याचा गुणात्मक दर्जा देखील. पाच इंद्रियां मार्फत येणाऱ्या संवेदनांवर हे अवलंबून असणार हे उघड आहे. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्याला अपुऱ्या गंधविश्वावर समाधान मानावं लागतं. पण अनेकजण किती समृद्ध गंधविश्व अनुभवतात हे मी (असूयेने) पहात असतो.

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/05/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

[माणसे इंजिनिअर होऊन येतात]

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 06/05/2019 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा माणसे इंजिनिअर होऊन येतात एकएक हट्टी सेमिस्टरे अटीतटीने लढवून ठेवतात, दोन वर्षांमध्ये एखादे ईयर डाऊन विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे इंजिनिअर होऊन येतात ज्ञानबिन भिरकावून केवळ परीक्षार्थी होऊन रात्रभर GT मारत बसतात उजाडताना परत सिगरेटच्या धूरात गुडूप होतात...... माणसे इंजिनिअर होऊन येतात...
काव्यरस

एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 05/05/2019 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत ------------------------------------------------------------ तू शहीद तिकडे देशासाठी इथे दुःख माझिया उरात एकेक स्वप्नाची राखरांगोळी मन आसवांच्या पुरात स्फोटाचा एकच दणका साऱ्याचे तुकडे तुकडे कुठे चिरफाळले देह कुठे विच्छिन्न मुखडे अग्नी दिला तरीही तुला डोळे शोधती धुरात कपाळाचं पुसलं कुंकू पदरात कच्ची बच्ची सांत्वनांचा काय दिलासा ही एकच गोष्ट सच्ची पुन्हा कधीही तुझी पाऊले ना वळणार या घरात न बलिदान हे जावो व्यर्थ या बलिदाना येवो अर्थ या देशाची सारी जनता लढण्या आहे समर्थ आपण सारे एक म्हणा रे सूर मिळवूनी सुरात बिपिन सांगळे

स्वामी

लेखक अन्या बुद्धे यांनी शनिवार, 04/05/2019 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना खरोखर महत्वाच्या गोष्टी कोणत्या? केवळ सवयीच्या, समाजाने लादलेल्या कोणत्या आणि आतून रुजून येणाऱ्या मूलभूत कोणत्या? कितीतरी गोष्टी, ज्यांना आपण जीवापाड जपतो, महत्वाच्या मानतो त्या किती फोल असतात ते नजर आत वळवून मूलभूत गोष्टींमध्ये 'ध्यान' लावल्याखेरीज उमजत नाही. हे ध्यान स्वयंप्रेरणेने करणारे बुद्ध होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना जगण्याने तशा स्थितीत जबरदस्तीने ढकलावं लागतं. आणि अर्थातच परिस्थिती आहे म्हणून ध्यान होईलच आणि त्यातून ज्ञान होईलच अशी खात्री देता येत नाहीच. आपल्या रोजच्या जगण्यात अशी, मोजा उलटा व्हावा तशी जगणं उलट होईल अशी उलथापालथ होईल अशी शक्यता कमीच.

कोणीतरी बाजूला सरकले असेल......

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 04/05/2019 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.

छत्रपती शिवाजी महाराज कि जय!

लेखक kool.amol यांनी शनिवार, 04/05/2019 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकताच आपण महाराष्ट्र दिन साजरा केला. एक महाराष्ट्रीयन म्हणून आपले नक्कीच काही मानबिंदू आहेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माणसाची व्याख्या करताना पु ल म्हणतात कि शिवाजी महाराज कि म्हणलं कि ज्याच्या तोंडातून आपोआप जय येत तो मराठी. इतकी समर्पक व्याख्या दुसरी कुठली असू शकते? अशा आपल्या हा मानबिंदूपुढे फक्त मराठीच नाही तर सगळा भारत नतमस्तक होतो. हे सांगण्यामागं कारण म्हणजे असं एक ठिकाण जिथे आपण एकाच वेळी नतमस्तक, आश्चर्यचकित आणि भारावल्यासारखे होतो. हे ठिकाण म्हणजे श्रीशैलम! तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल कि श्रीशैलम आणि शिवाजी महाराज हे काय नातं आहे ?

(धागा काढण्याची तल्लफ)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 03/05/2019 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधी

सोबती

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 03/05/2019 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
मनापासून बोलतो मनापासून ऐका वागावे कसे माझ्याशी फिटतील सर्व शंका चाललो पुढती तरी त्यात ना अर्थ काही नका येऊ मागुती मी कुणी नेता नाही तुम्ही पुढे मी मागे चित्र असे दिसले जरी मी नव्हे अनुयायी गोष्ट ही आहे खरी रहा आसपास माझ्या मार्ग चालू सोबतीने परस्परांचे मित्र होऊ जोडुनी आपली मने -अनुप