साध्वी
- डॉ. सुधीर रा. देवरे
लेखकाचा मोबाईल वाजला. लेखकाने स्क्रीनवर पाहिलं. नंबर होता. फोनमध्ये सेव्ह नव्हता. फोन घेत लेखक म्हणाले, ‘नमस्कार.’
‘सोनवणे साहेब, तुम्ही आश्रमात येताहेत ना. कार्यक्रम सुरू होत आहे साहेब.’ तिकडून खूप घाईत असलेली महिला बोलत होती.
लेखक म्हणाले, ‘कोण हवंय तुम्हाला?’
‘मी सुमनताई बोलते. सोनवणे नगराध्यक्ष साहेबांचा फोन आहे ना?’
लेखक म्हणाले, ‘नाही.’
‘कोण बोलताय आपण?’
‘सुधाकर पाटील’
‘हा नंबर सोनवणे साहेबांचा नाही?’
‘नाही’
‘नंबर तर सेव्ह आहे माझ्याकडे’ म्हणत फोन कट झाला.
पाच सहा दिवसांनी लेखकाला याच नंबर वरून पुन्हा फोन आला.
मिसळपाव