Skip to main content

झोल? चच्चडी?

लेखक नूतन यांनी रविवार, 06/10/2019 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.

India Deserves Better - ४. शेती , राजकारण आणि त्यातील विसंगती आणि समस्या

लेखक गणेशा यांनी शनिवार, 05/10/2019 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : शेती या विषयाशी माझा डायरेक्ट काही संबंध नाही, पण माझ्या आसपासच्या समस्या मांडताना, शेती आणि शेतकरी हे घटक त्यातुन सुटु शकत नाहीत. त्यामुळे खोल अभ्यास नसला तरी वरवर जे मला थोडेफार माहीती आहे आणि मला जे वाटते आहे , जे वाचले आहे त्यावरुन लिहितो आहे. तरीही शेतीतील नेहमीचे जे प्रश्न आहेत, तेच पुन्हा न मांडता त्या व्यतिरिक्त बोलण्याचा थोडा प्रयत्न करतो. शेतकरी आत्महत्या तर मनाला खुपच क्लेष देवुन जातात म्हणुन तो विषय ही मी येथे घेत नाहीये.. (त्यात आज सकाळी उठल्या ऊठल्या 'आरे' च्या बातमी ने मन विषन्न केले आहे.

मन आणि पृथ्वी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 05/10/2019 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे एकदा पृथ्वी मनास, "चल, खेळ एक खेळू, आजमावू आपापली शक्ती खास." ऐसे म्हणुनी पृथ्वी क्षणात खेचे सर्व चेतन,अचेतनास, म्हणे हसुनी," रे मना! तुझ्यासकट ही शरीरांची रास, तुला आकर्षण्या न उरले काही आता, शांत का झालास?" हात जोडोनी सस्मित मन बोले, " माते, तुला हरवण्याची कधीच नव्हती आस, तुझ्या कृपेच्या ओझ्याने दबलेला मी क्षुल्लक अणूमय दास.

तिखट कडकणी by Namrata's CookBook : १७

लेखक Namokar यांनी शुक्रवार, 04/10/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस : १ वाटी मैदा १ वाटी बेसन पीठ २ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता) मीठ तेल पाणी जिरे ओवा क्रमवार पाककृती: १. एका भांड्यात /परातमध्ये १ वाटी मैदा , १ चमचा रवा / सूजी घ्या आणि चवीनुसार मीठ घालून , आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या. २. आता थोडेसे तेल घेऊन पुन्हा कणीक मळून घ्या.

दो डोळ्यांचे....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना (शॉर्ट-फिल्म)

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची.

मी अजिबात घाबरत नाही....! - २

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 04/10/2019 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू. तुर्तास महत्वाचे हे, की ती माझी सवय बनली आहे..... (की व्यसन?) तिला पाहिले नाही की रात्री निद्रादेवी सुद्धा माझ्यावर प्रसन्न होत नाहीत.

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.