Skip to main content

मतदान करा बे 

लेखक सौरव जोशी यांनी रविवार, 20/10/2019 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक प्रचार थांबला बुवा एकदाचा.... कोणी ३७०-३७० बोंबलल तर कोणी पावसात भिजलं, कोणी नकला करून दाखवल्या तर कोणी शकला लढवून दाखवल्या. तस neutral राहून बघितलं तर सर्व पक्षांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवलीय. चला या सर्व पक्षांनी दाखवलेल्या प्रगल्भ विचारसरणीची लख्तर काढू.

गंमत घ्यावी..‌

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 19/10/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते, चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके. करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी. काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी.. कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल. हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल. फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल .. त्या पानाचा भार केवढा??
काव्यरस

निसर्ग-शशक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 19/10/2019 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग --------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये. मलाही छान वाटतंय ! चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे.

सायकल दौरा पूर्वेचा घाट - अंतिम भाग

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 19/10/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग सायकल दौरा पूर्वेचा घाट - का कसा कुठे? सायकल दौरा - पूर्वेचा घाट असा घातला घाट १, , आणि Araku अराकु डोंगरांच्या मधे वसलेले छोटेस शहर, आंध्र प्रदेशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, आंध्र आणि तेलंगाणा भागातले महत्वाचे हिल स्टेशन अराकुची अशी कितीतरी ओळख देता येईल.

साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!

लेखक मालविका यांनी शनिवार, 19/10/2019 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही .

( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 18/10/2019 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात खजुराहो, झाशी, ओरछा अर्थात चांदेला आणि बुंदेला प्रांतात भटकंती झाली. गाभा

भारतातील परदेशी पर्यटकांची जी आवडती ठिकाणं आहेत त्यात ताजमहाल, गोवा, पॉन्डीचेरी, हरद्वार,वाराणसी,कूर्ग,खजुराहो, अजिंठा,वेरुळ, केरळ आणि राजस्थान राज्ये येतात. मागच्या आठवड्यात यांपैकी खजुराहो पाहण्याचं जमलं कारण तिथे सकाळी सहाला पोहोचणारी इंदौर-खजुराहो गाडी (19663) एक जुलैला (२०१९)सुरू झाली. तसा खजुराहो विमातळ आहेच (५ किमीवर) , दिल्लीची एक गाडी स्टेशनला (८किमी)अगोदरपासून आहे. फक्त खजुराहो न करता त्याला जोडून काय पाहता येईल याचा शोध घेतला.

बेंगलोर ट्रिप मधे काय का पहावे ??

लेखक अर्पित यांनी शुक्रवार, 18/10/2019 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहकुटंब 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी बंगलोर जायची योजना केली आहे. बेंगळुरू मधे मित्रचया घरि रहनार आहे पन काही दिवस जवळपास भटकंती करायचा मानस आहे। दिमातीला मित्रचि गाडी आसेलच. मित्र सोबत नसताना सुधा आसपस कुठे फिरता येईल त्यासाथी मार्गदर्शन करावे. अंतरजलावर पहिल्यनादा मराठी लिहितोय त्यामुले शुद्धलेखनासाथी माफी असावी

मदत हवी आहे

लेखक गतीशील यांनी शुक्रवार, 18/10/2019 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक जवळचा मित्र माद्रिद, स्पेन येथे २ वर्षासाठी जाणार आहे. त्याला तिथे भाड्याने फ्लॅट मिळवून देण्यासाठी कोणी मदत करू शकेल का? तो, त्याची पत्नी आणि १ वर्षाचा मुलगा असे तिघे राहणार आहेत तिथे.

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 18/10/2019 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलक