Skip to main content

बोटावर शाईचा अजून रंग ओला

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 17/11/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बोटावर शाईचा अजून रंग ओला माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला विश्वासून तुझीयावर मते तूला दिली राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला पैजारबुवा,

फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 16/11/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
फत्तेशिकस्त मराठी चित्रपट: (कथा आणि परीक्षण) - निमिष सोनार, पुणे दिगपाल लांजेकरचा "फर्जंद" मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण "चौकोनी कंसातील" वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल. राजगडवर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात.

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/11/2019 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.

प्रेम 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 15/11/2019 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम 1 त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच.

मलेशिया, सिंगापूर सहल

लेखक Nitin Palkar यांनी गुरुवार, 14/11/2019 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंम्बरच्या तिसऱ्याआठवड्यात मलेशिया, सिंगापूरची एक आठवड्याची सहल आखतोय. कोणत्याही सहल आयोजकाशिवाय. मी आणि एक मित्र आणि दोघांच्याही गृह स्वामिनी असे चौघेही ज्येष्ठ नागरिक आहोत. विमानाची तिकिटे आणि दोन्ही देशातील हॉटेल्स आरक्षित केलेली आहेत. याविषयी जाणकार मिपाकरांकडून अधिक मार्गदर्शन, सूचनांच्या अपेक्षेत. विशेषतः परदेशी चलन किती व कुठचे घ्यावे, स्थल दर्शनासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी खाजगी टॅक्सीने फिरल्यास खर्चात आणि सोयीत किती फरक पडू शकतो, इ. इतरही काही सूचना असल्यास स्वागतच आहे.

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
बघा मुद्दे पटले तर १) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती २) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच ३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच ४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ?

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज ) आमच्या वार्ताहराकडून हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले ( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला

प्रीति करो मत कोय॥

लेखक शरद यांनी मंगळवार, 12/11/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण मीरेच्या भावविश्वातले एक मनोहर रूप पाहूं. "विरहिणी". सर्व संतांनी, त्यांत पुरुष संतही आले, विराणी लिहल्या. जेथे ज्ञानदेवासारखा एक बालयोगीही विराण्या लिहतो तेथे तुम्हाला मीरेने विराण्या लिहल्या, हो, अनेक लिहल्या, याचे नाविन्य वाटणार नाही. पण मीरेकडे वळण्याआधी जरा विषयांतर करण्यास परवांगी द्या. संतांनी विराण्या कां लिहल्या ? संतांची परमेश्वरावर श्रद्धा आहे. परमेश्वराची व आपली भेट व्हावी; अगदी सायुज्यता नाही तरी किमान समिपता लाभावी ही आंस. पण मुक्तीचतुष्टय हे तत्वज्ञानात ठीक. आपल्या नेहमीच्या व्यवहारात वा भाषेत हे कसे सांगावे ?

सिक्रेट धंद्याचे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/11/2019 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी का ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी गेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही काही आजारी आहे का? का इतर काही? "क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम आजकल मै हू बडी बिज्जी," - गाली गोड हासून रात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती वहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती निलू बोले, "मजा है बै तुझी काम मे बिज्जी माझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी" तर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे आधी होते तिचे वांधे खायचे "मेरेकू जादा काम करना पडता है, क्यूं की नये आमदार हाटेल में अटके है"