फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)
In reply to फर्जंद.... by महेश हतोळकर
दोघांना कुरवांडा आणि ताम्हिणी घाटातून वेढतात.उंबरखिंडीच्या युध्दात ताम्हीणी घाटाचा काय संबंध ?
एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात.हा ईतिहास यांना कोठे सापडला ? असो. बाकी चिन्मय मांडलेकर कोणत्याच अँगलने शिवाजी महाराज दिसत नाहीत. सध्या तरी अमोल कोल्हेना पर्याय नाही. अर्थात हे वैयक्तिक मत.
In reply to चित्रपट बघायची उत्सुकता आहे, by दुर्गविहारी
In reply to दुर्गविहारी साहेब !!! by ट्रम्प
In reply to चित्रपट बघायची उत्सुकता आहे, by दुर्गविहारी
एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात. हा ईतिहास यांना कोठे सापडला ?दुर्गविहारी जी, प्रॉपोगेंडा हाच मुळ उद्देशाने, जर चित्रपट निर्मिती झाली असेल तर, गेल्या ४-५ वर्ष्या पूर्वीची घटना (आठवा भारतीय सैनिकांचे शीर पाकिस्तानी सैन्या तील लोकांनी कापले होते , हेमराज असें काही नाव होते बहुदा ) ही ३००-४०० वर्ष्या पूर्वीची म्हणून सहजच घुसडून देता येते हो. कोणाला आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेशी बांधिलकी ? मोटाभाईंच्या नजरेत भरावं म्हणून हा खटाटोप....
In reply to चित्रपट बघायची उत्सुकता आहे, by दुर्गविहारी
In reply to सहमत आहे. by किल्लेदार
In reply to चित्रपट बघायची उत्सुकता आहे, by दुर्गविहारी
In reply to """"शाहिस्तेखानाची बोटे by श्रिपाद पणशिकर
In reply to मी फक्त चित्रपटाबद्दल लिहिले आहे, इतिहासाबद्दल नाही!! by निमिष सोनार
In reply to मी फक्त चित्रपटाबद्दल लिहिले आहे, इतिहासाबद्दल नाही!! by निमिष सोनार
In reply to ऐतिहासिक चित्रपट हा माहितीपट नसतो.. by कळस
In reply to चित्रपट हा नक्कीच माहितीपट by दुर्गविहारी
In reply to असे कसे होईल ? by कळस
माझ्या मते उगीचच काही गोष्टींवरून नाराजीचा सुर आळवण्यापेक्षा एकंदरीत या चित्रपटाचा हेतू लक्षात घेऊन आपल्याला न आवडलेल्या गोष्टी प्रगल्भतेने नजरेआड केल्या पाहिजेत आणि अशा चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे.प्रोत्साहन द्यायला कोणाचीच ना नाही. किंबहुणा असे चित्रपट लोकांनी चित्रपटगृहात बघावेत यासाठी मी आग्रही असतो. पण ईतिहास अस्सल पुराव्यावर चालतो, त्याशी फारकत घेउन काही दाखविल्यास हळूहळू तेच खरं असा समज पसरत जातो. अगदी श्रीमान योगी, छावा या कांदबर्यामुळे हेच झाले आहे. कल्याणच्या सुभेदाराची सुन किंवा रामदास स्वामीना राज्य बहाल करणे असे पुर्णपणे काल्पनिक प्रसंग आज लोकांना खरे वाटतात. वर त्याचा आधार म्हणून वरील कांदबर्यांचा संदर्भ दिला जातो. वास्तविक श्रीमान योगीच्या प्रस्ताविकमध्ये रणजीत देसाईनी स्पष्टपणे लिहीले आहे , कि मी काल्पनिक गोष्टी कांदबरीत घेतल्या आहेत, तरी नेमके काय काल्पनिक आहे हे स्पष्ट नसल्याने वाचक असे प्रसंग खरे मानून चालतात. याप्रकारात संभाजी महाराजांचे नुकसान सर्वाधीक झाले आहे. व्यसनाधीनतेपासून थोरातांची कमळापर्यंत असंख्य काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपवल्या गेल्या, ज्याचे संपुर्ण निराकरण व्हायला फार वेळ लागेल, कदाचित सध्या असलेली मालिका हि उणीव भरुन काढेल. तेव्हा चित्रपट बनवण्यावर आक्षेप नाही, तर ते सत्याला धरुन असावेत याबद्धल आग्रह आहे. बाहुबलीसारखा पुर्ण काल्पनिक चित्रपट बनवा, काही म्हणने नाही, पण नाव शिवकालाचे घ्यायचे आणि वाट्टेल ते दाखवायचे, तर चालणार नाही.
शिवाजी महाराजांचा इतिहास नव्याने सर्वदूर पोहोचवण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत.त्यांना शाबासकी नाही देता आली तरी कृपया नाउमेद करू नका हीच विनंती.हे महान कार्य काही आत्ताच होत नाही आहे. अगदी भालजी पेंढारकरांपासून ते रमेश देवांनी काढलेल्या सर्जापर्यंत एतिहासीक चित्रपट निघाले आहेत, पण मुळ ईतिहासाशी छेडछाड दिसली तर टिका होणार. फक्त स्वताचा गल्ला भरायसाठी तुम्ही काहीही दाखवणार असाल तर आक्षेप आल्यानंतर पळ काढू नका.
In reply to माझ्या मते उगीचच काही by दुर्गविहारी
In reply to माझ्या मते उगीचच काही by दुर्गविहारी
In reply to ऐतिहासिक चित्रपट हा माहितीपट नसतो.. by कळस
In reply to सध्या तरी अमोल कोल्हेना पर्याय नाही. अर्थात हे वैयक्तिक मत. by धर्मराजमुटके
In reply to +१ सहमत आहे by जॉनविक्क
In reply to चिन्मय by प्रियाभि..
In reply to फर्जंद अतिशय टुकार चित्रपट by उपेक्षित
जोगवा हे गाणं जे बहुरूपीच्या वेषात बहिर्जी म्हणतो ते खूप छान आहे.छान तर वाटणारच, कारण चाल हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा ची जशीच्या तशी ढापली आहे. मला चित्रपट आवडला.
फर्जंद छान होताच