Skip to main content

आशय - भाग ७ - समाप्त

लेखक किंबहुना यांनी शुक्रवार, 06/12/2019 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ प्रस्तावना - पहिल्या प्रस्तावनेत पण मी म्हणालो होतो, की महिला अत्याचार हा साधारणपणे नेहमीच ऐरणीवर येणारा विषय आहे, पण पौगंडावस्थेतील मुले देखील बऱ्याच वेळेस अश्याच गोष्टीना सामोरी जात असतात. या भागात अजून काही टाळता ना येण्याजोगे प्रसंग येतील. यामध्ये मला स्वतःला victim card खेळायची इच्छा नाही, देवाच्या कृपेने मी आता वयाच्या अश्या टप्प्यावर आहे की या गोष्टींचा काहीही दृश्य परिणाम माझ्या आयुष्यावर नाही, मला स्वतःला मुलगा पण नाही, ज्याची मी काळजी करावी.

क्लीनचीट ची फॅक्टरी

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 06/12/2019 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/… धूतपापेश्वर जसा वाढू लागला अपराध तशी वाढली गरज उद्धार-हात काहींनी मिळवली यावर डाॅक्टरी आणि उघडली क्लीनचीट ची फॅक्टरी जनता पहातेय कारभार नंगा घ्या धूवून हात जोवर वहातेय सत्तेची गंगा कधीतरी उघडेल जनता तिसरा डोळा आणि भ्रष्टघराणी होतील चोळामोळा.
काव्यरस

दोसतार -२७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 06/12/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/45778
ती दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रीणीना सांगणार, ती त्यांच्या मित्रमैत्रीणीना , त्या त्यांच्या, ती त्यांच्या. असे करताना कोणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर तेही ऐकणार, आणि ते त्यांच्या त्यांच्या गावी गेल्यावर तिथे सांगणार. ते ज्याना सांगणार ते इतरांना सांगणार. हळू हळू हे भारतभर होणार. बातम्या अशाच पसरत असतील. ….
रेडीओवरच्या बातम्या सगळेजण एकाच वेळेस ऐकतात . त्यांना पसरवायची गरज नसते. पण एकाला समजलेली बातमी तो दुसर्‍या दोघांना सांगतो. दुसरे दोघे आणखी दोघा दोघांना सांगतात.

कव्वाली: तुला पाहिले की

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/12/2019 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली: तुला पाहिले की किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते पण तुला पाहिले की काळजात धकधक होते किती तू वार केले माझ्या हृदयावर खोल जखमा वरून केल्या त्यावर नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये तुला पाहिले की काळजात धकधक होते सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी? तुझा चेहेरा समोर जेव्हा जे

दोसतार - २६

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/12/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/45761#comment-1054834 पावसाची ना कशी गम्मत असते. अगोदर येतो तो त्याच्या येण्याची जहीरात करत. दवंडी पिटत. एकदम गडगडाट करत विजा चमकवत. तडाम तडाम ताशा वाजवत. आपल्याला डोळे झाकून कोणीतरी भॉ करावे तसा. अचानक गाठतो. रस्त्यावरून चालणाराला भिजवून टाकतो. शिवाजी महाराजानी कारतालब खानाला खिंडीत गाठला तसा. पावसाळा तसा सगळाच आवडतो. पण खास आवडतो तो पहिला पाऊस. पाटणची आज्जी तर मुद्दाम या पहिल्या पावसाची वाट पहायची. पहिला पाऊस आला की ती एकदम खुशीत यायची. खरे तर तीला पावसात भिजायचे असे.

मंतरलेले दिवस – ३ : शास्त्रीय संगीत समारोह

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 04/12/2019 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर आला की येणार्‍या थंडीची चाहूल लागते. सहलींचे मनसुबे रचले जातात. त्याचबरोबर संगीत समारोहांचे देखील वेध लागतात. भारतात ठिकठिकाणी शास्त्रीय संगीत समारोह भरतात. गेल्या आठवड्यात केव्हातरी चित्रवाणीवर वाहिन्या चाळता चाळता एका समारोहातल्या मैफिलीचे दृश्य आले आणि अशा कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. शास्त्रीय संगीत हे भारताच्या संस्कृतिक अस्मितेचे एक प्रतीक. गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीवरून आठवले होते पं. गामेखां पुण्यतिथी, पं पलुस्कर पुण्यतिथी अशा निमित्ताने चालणारे शास्त्रीय संगीताचे समारोह, सोहळे. परंतु विस्तारभयास्तव ते लिहीले नव्हते. ते इथे सादर करतो.

दुर्वास

लेखक निराकार गाढव यांनी मंगळवार, 03/12/2019 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओजस्वी संन्यासी ज्यास विमुक्तीचा ध्यास । करि ध्यान रात्रंदिन करि शास्त्रांचा अभ्यास ।। रुक्ष ज्याची दिनचर्या करि कडक उपास । ओढी अतोनात कष्ट किती सेवेचे सायास ।। ऐसे दिन कित्ती गेले हिमालयाच्या कुशीत । तैसा राहून एकला जाले महीने, वरिस ।। पण एके दिनी येता मातापित्यांचा आठव । परतला मूलग्रामी, गृही, शोधुनिया ठाव ।। जैसा परतला गृही, दिसे गर्दी, कोलाहल । दिले झोकून संसारी झाला कल्लोळ अपार ।। साही अपेक्षांची ओझी स्वार्थी, पोटार्थींची ढोंगं । होई वेळोवेळी क्रोधी, खूप व्याकूळ, व्याकूळ ।। मग एके सायंकाळी झाला वदीता मातेस । मनातली तगमग, सारा मनातला त्रास ।। "हिमालयी बैसोनिया केले होते किती तप ।

कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

लेखक avichougule यांनी सोमवार, 02/12/2019 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
### कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ ### खूप दिवसानंतर लिहायचा योग आला आहे निमित्त आहे कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ मागच्या वर्षी ट्रायथलॉन झाल्या बरोबर ठरवलं होत की पुढच्या वर्षी परत नक्की करायचं, कारण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता, हो हो सोहळाच. मग काय एप्रिल मध्ये ट्रायथलॉन ची तारीख आली आणि लगोलग आम्ही सगळे मित्रपरिवाराने नोंदणी केली. झालं एकदाची नोंदणी, ट्रायथलॉनला अजुन ६-७ महिने आहेत तेवढ्यात होईल तयारी असा विचार करून शांत राहिलो.. त्यात उन्हाळा सुरू झाला म्हणून म्हटलं नंतर तयारी करू, मग काय पावसाळा.

खुनाचा तपास आणि झाडाच्या शेंगा !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 02/12/2019 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गुन्हेगारी विश्वावर आधारित अनेक टीव्ही आणि जालमालिका लोकप्रिय असतात. त्यातील काही मोजक्यांत शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याची उकल सखोल दाखविली जाते. खून,बलात्कार, जबरी मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात न्यायवैद्यकशास्त्राची खूप मदत घेतली जाते. अशा तपासाचे अंतरंग उलगडून दाखविणारी एक सुरेख मालिका म्हणजे 'फॉरेन्सिक फाईल्स '. ही माहितीपटासारखी मालिका काही वर्षांपूर्वी अमेरिकी टीव्हीवर प्रक्षेपित झाली होती. आता त्यातले काही भाग जालावर बघण्यास उपलब्ध आहेत. वास्तवातील घटनांवर आधारित ही मालिका आहे. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक भाग मी नुकताच पाहिला.

दूष्काळ झळा...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 02/12/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चोचभर दाण्यासाठी वेशी बाहेर पाखरं टीचभर पोटासाठी घर उंबर्‍याशी वैर || पाणी आटलं डोळ्यात शेत जळलं रानात पोर धाडलं शरात गाव दुष्काळ पिडित || कधीची दारातली तुळस .. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली... पांढर्‍या रानागत गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, जेंव्हा होता आवळला फास... नाही गोठ्यामधी माय ना टोपल्यात भाकर गुलछडी उभी पेटली काऴळ ठिक्कुर घर || शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली, अन्नाचा कुठ हाय तपास... शासनाची पांढरी बुजगावनी..
काव्यरस