Skip to main content

कम्फर्टेबल..!!

लेखक आजी यांनी गुरुवार, 14/05/2020 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला हवी तशी उशी मला अजूनही मिळालेली नाही. माझ्याकडे माझ्या खास बघून आणलेल्या अशा सात उशा आहेत, पण त्यांतली एकही उशी नंतर मला कंफर्टेबल वाटत नाही. मला त्यांतली एकही फायनली पसंत नाही. काही उशा फारच जाड तर काही फारच पातळ. उंच उशी फार उंच होते आणि पातळ उशी फार पातळ होते. दोन पातळ उशा एकमेकांवर ठेवूनही बात बनती नहीं. "मध्यम" उशीही मानेला कंफर्टेबल वाटेलच असं नाही. कुशीवर झोपलं की डोकं आणि खांदा यांत अंतर पडतं आणि मान लटकत राहाते.

नयनरम्य लोभी

लेखक Vivek Phatak यांनी बुधवार, 13/05/2020 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण जुलै महिन्यात मला विजय गव्हाणेचां मेसेज आला की लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकला तुम्ही यायला उत्सुक आहात का. ट्रेक सप्टेंबर महिन्यात जाणार होता आणि स्वच्छंदी ट्रेकर्सने हा ट्रेक आयोजित केला होता. माझा अजुन एक मित्र वैभव सुध्दा जायला तयार होता. मी ह्या ट्रेकबद्दल गूगल वर वाचले होते. हा साधारण ७५ किमीचा जंगल ट्रेक आहे आणि तो पूर्ण करायला दोन दिवस लागतात. ह्याचे व्हिडिओज खूप सुंदर होते त्यामुळे माझी जबरदस्त इच्छा होती हा ट्रेक करायची.

खारे मफिन

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 13/05/2020 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
खारे मफिन मफिन म्हणले कि डोळ्यासमोर गोड चॉकोलेट चिप किंवा ऑरेंज पॉपी सीड ( काळी खसखस ) येतात खाऱ्या पद्धतीचे पण करता येतात साहित्य : कंसामध्ये भारतात सहज उपलब्ध असलेले जिन्नस सुचवले आहेत - २ कप सेल्फ रेझिंग फ्लावर ( मैदा + बाई कर्रब सोडा + बेकिंग पावडर ) - १ कप ताक - २-३ टी स्पून ऑलिव्ह तेल ( लोणी) - सन ड्रॉइड टोमॅटो ( टोमॅटो च बारीक तुकडे तिखट मिठावर परतून वापर किंवा गाजराचे अगदी बारीक तुकडे तिखट मिठावर परतून घ्या) - १ अंडे - पार्सली ( कोथिंबीर) - ऑलिव्ह ( ?) - टेस्टी जातीचे चीज ( कोणतेही खारट चीज शक्यतो मोझ्झरेला जातीचे चिवट चीज नको ) कृती: - मैदा , चीज, पार्सली एकत्र करून ठेवावे

मेळघाट ४: कोळकास (अंतिम)

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 13/05/2020 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी मेळघाट २: नरनाळा किल्ला मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ मचाणावरील एक अविस्मरणीय रात्र घालवून सकाळी ७ च्या आसपास परत शहानूर येथील मुक्कामाच्या जागेत आलो. रात्रभर जागरण झाले असल्याने आंघोळ करुन सर्वच जण परत झोपलो.

घे भरारी..

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 13/05/2020 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
घे भरारी.. स्वप्नसुखांचे लेवुन पंख घे भरारी गगनात आभाळ आहे तुझेच परि तु तुझिया मायेला विसरु नको श्वासात घे भरुन तु ती अविरत ऊर्जा त्या भानुची घे भरारी गरुडापरि तु असुदेत एक नजर भूवरी नंदादीप तो जळत राहो तुझ्या इच्छा-आकांक्षाचा निसर्गाचे ते अनमोल देणे तु परतवत रहा त्याला - Dipti Bhagat
काव्यरस
Taxonomy upgrade extras

मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 13/05/2020 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर .* कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली. सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज 75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता. आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते. कराड पार केले आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली.

मैत्री असावी...

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 13/05/2020 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री असावी... मैत्री मैत्री असावी खळखळत्या वाहत्या झऱ्यासारखी रातराणीच्या सुगंधासारखी आसमंतात दरवळणारी मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारी मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारी मैत्री मैत्री असावी पहाटेच्या समीरासारखी गारवा देणारी मैत्री मैत्री असावी उगवतीसारखी नवा आशेचा किरण होऊन आयुष्य तेजोमय कराणारी! - Dipti Bhagat

कथा - टीआरपी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 12/05/2020 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------------------- कथा - टीआरपी --------------------------------------------------------------------------------------------- “ सॉरी मॅडम ” ... शरदिनी त्या असिस्टंट डायरेक्टरकडे आश्चर्याने पाहतच राहिली . तिला काही कळलंच नाही. तो पुढे बिचकत म्हणाला , " तुमचा रोल आपण थांबवतोय ." “काय ?” ती चमकली .भडकलीच ! तो गप्प खाली मान घालून, निघून गेला. ती धप्पदिशी त्राण गेल्यासारखी खुर्चीत बसली. रामप्यारे तिच्याकडे पाहत राहिला. नुसताच. पण मनातून तर त्याला बरंच वाटत होतं. तिचे नखरे फार असत. अन मेकअपवरून ती त्याला बोलायची .