Skip to main content

मित्र

मैत्री असावी...

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 13/05/2020 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री असावी... मैत्री मैत्री असावी खळखळत्या वाहत्या झऱ्यासारखी रातराणीच्या सुगंधासारखी आसमंतात दरवळणारी मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारी मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारी मैत्री मैत्री असावी पहाटेच्या समीरासारखी गारवा देणारी मैत्री मैत्री असावी उगवतीसारखी नवा आशेचा किरण होऊन आयुष्य तेजोमय कराणारी! - Dipti Bhagat