Skip to main content

तुझी वाट

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 23/07/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी चोरपावलाने हळूच तू येऊन जा पाखरांचे उदास सूर घेऊन जा जाग्या झाल्या भोवती रानसावल्या आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
काव्यरस

सोहळा

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 23/07/2020 15:38 या दिवशी प्रकाशित केले.

 जाई बरसुनी मेघ
 करी धरेशी सलगी
 धरा येता मोहोरुनी
 विरे मेघ तो बैरागी

आसुसल्या धरणीशी
 गाठ पडता जळाची
 बीज अंकुरुनी येई
 कुस चिरीत आईची

 हात जोडुनिया कोंब
 सांगे भूमीचे मार्दव
 जरा थांब क्षणभर
 करी मेघाला आर्जव

 वीण बांधुनी भुईशी
 करी लवलव पाते
 नवलाईचे हे बंध
 झाले नव्हत्याचे होते

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/07/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 23/07/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.

चित्रसंते : चित्रांची महाजत्रा !

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 23/07/2020 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
जेंव्हा केंव्हा आपलं नशीब जोरदार असतं त्या वेळी अतिशय सुंदर योग येतात ! असाच एक सुंदर योग मी बंगळुरूला असताना आला ! "चित्रसंते" येत्या रविवारीच भरणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली अन लगेच ठरवून टाकलं हा योग अजिबात चुकवायचा नाही ! रविवारी सकाळी लवकरच उठलो, पीजी हॉस्टेलवरून पासून गोविंद शेट्टी पाळळ्या रोडच्या शॉर्टकटने हायवेचं इ.सी. सर्कल गाठलं. कॉर्नरच्या रूचीसागरला नेहमी प्रमाणे नाश्ता आणि एक झकास फिल्टर कॉफी मारली. बीएमटीसीनं मॅजेस्टिक गाठलं. चित्रसंते जिथं भरणार होतं तो कुमार कृपा रोड मॅजेस्टिकपासून ३-३.५ किमीवर असल्यामुळं सरळ रिक्षा पकडली !

युग प्रवाहीणी

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 23/07/2020 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
युग प्रवाहीणी -+-*-+- समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय, या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव अथवा एखादा शांत, एकांत आश्रम... विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी स्मरणात असे

तरबूज / खरबूज ज्यूस musk melon juice

लेखक Gk यांनी बुधवार, 22/07/2020 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: टरबूजे , लिम्बु, संतरे गर साखर मीठ चाट मसाला आले किसुन पाणी क्रमवार पाककृती: 3 टरबूजे घेतली , musk melon वरुन छोटीशी स्लाइस कापून घेतली. आतील बिया काढून टाकल्या. चमच्याने सगळा गर काढून घेतला.

पनीर लबाबदार!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/07/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो पनिरायण मे अगली रेशिपी है.. पनीर लबाबदार! तर ही पनीर लबाबदार व्हायला आमची होम मिनिष्ट्री च जबाबदार आहे! (लबाबदार..जबाबदार! जमलं की नै यमक,ते आगोबी गमक!.. परत जमलं! काय हे? http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आगोबानी मारला फेसबुकवर दगड,मन म्हणलं त्याला इथेच रगड!!! आयायाया! परत पडली जिलबी!आणि झालो मी एलबी!.. थांबचत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif बुळुक बुळुक बुळुक!

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 21/07/2020 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचू शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ ) चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते.

माझा कोविड अनुभव

लेखक अश्विनी मेमाणे यांनी मंगळवार, 21/07/2020 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत.