Skip to main content

अनुष्टुप/अनुष्टुभ सराव - हलकीफुलकी काव्यपूर्ती

लेखक धष्टपुष्ट यांनी सोमवार, 10/08/2020 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
गंमत म्हणून हा धागा. शाळेत गाळलेल्या जागा भरायचो तसंच. खाली अर्धवट लिहिलेली ओळ आहे - ती अनुष्टुप छंदामध्ये पूर्ण करता येते का बघा. दिलेल्या उदाहरणात माफक बदल केलात तरी चालेल. शब्द आकलनीय राहीपर्यंत लघु गुरु मध्ये स्वातंत्र्य आहे. बाष्कळपणाचे स्वागत. . आकृतिबंध पहिल्यांदा संदर्भासाठी देतोय.

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 10/08/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक.

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 10/08/2020 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
पान खाता खाता आठवतं काहीबाही.. हिरव्या कंच पानाचा देठ नखंलताना आज्जी म्हणायची, "स्वस्ताई होती तेव्हा... दोन रुपयांना हेss पोतंभर तांदूळ. ओंजळीनं घ्यायचो तपेल्यात... वाटी वगैरे नाही आत्तासारखं.." पान मांडीवर पसरायची, सुरकतलेल्या हातात अडकित्ता घ्यायची, "चोर पकडले जायचे, शिक्षा व्हायच्या... आत्तासारखं नाही." चंचीतली सुपारी आडकित्त्यावर अलवार कातरायची ती.. पानावर चुन्याचं अल्लद बोट लागायचं, त्यावर कात सुपारी मांडत म्हणायची, "इंग्रज गेले आणि सगळी शिस्त गेली. शिस्त गेली तशी स्वस्ताई गेली." पानाची घडी करून ती तोंडांत सारून ती पुढे सांगायची, "पूर्वी पानात केशर घालायचे मी.

अस्फुट

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/08/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते
काव्यरस

Electromagnetism चा बहुमुखी  वैश्वानल  : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे  फोटॉन्स,...,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता      

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 09/08/2020 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक  पावसाळी, घोर अपरात्र वाटावी अशी अवसेची रात्र. दूर जिथे पाहावे तिथपर्यंत काळा कभिन्न अंधार पडलेला. आकाशात काळे ढग दाटून आल्याने रात्रीचा गडद पणा अधिकच वाढवलेला... क्षितीजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ढगांचा वेढा पडल्यावर, साऱ्या आसमंताला बंदिवासात टाकल्यावर, जेलरने गुरकावावे तसे ढगांचा गुरगुरणारा, डरकाळी फोडल्यासारखा आवाज सर्वांनाच एक धमकावणी वजा सूचना देऊन गेला. त्यापाठोपाठ पकडलेल्या कैद्यांच्या डोळ्यांसमोर अंधारीच आणण्यासाठी म्हणून कीं काय एक विजेचा मोठ्ठा सोटा दण्णकन सर्वांच्या डोळ्यांना अंधारी आणून निघून गेला..

आठवणी..

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 08/08/2020 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
उगवत्या आणी मावळत्या सुर्याच्या वेळा वेगवेगळ्या भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतात हे समजायचं ते वय नव्हतं. सकाळी उत्साहात उठून शाळेच्या गडबडीत असलेला मी जेंव्हा घरासमोरच्या अंगणात आजोबांच्या देवपुजेसाठी फुलं तोडायला जायचो ,झाडांच्या गर्दितुन पुर्वेकडे उगवलेल्या सुर्याची किरणं पाणी तापवायच्या बंबातुन निघालेला धुर कापत अंगणात यायची.त्या किरणांच्या फांद्यांमधुन डोकावणार्या सरळ रेषा अस्ताव्यस्त पसरलेल्या धुराला एका मर्यादेत आखताहेत असं वाटायचं. तो धुराचा आणी किरणांचा खेळ बघत घाईघाईने फुलं गोळा करुन देउन मी घरामागच्या भिंतीवरुन उडी मारत शाळेत जात असे.

केरळ कढीलिंब झिंगे

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 08/08/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ कढीलिंब झिंगे खुलासा: मी यात आळस केला आहे , तयार मदर्स रेसिपी ( देसाई बंधू पुणे किंवा "परंपरा ") या नावाचा "केरळ झिन्गा फ्राय" हा तयार मसाला वापरला आहे त्यामुळे १० पैकी मला २ च गुण. हा मसाला कोरडी पुड नसून मासात तेलात घोळलेला , कांडा परतून घातलेला असा असतो त्यामुळे खरे तर त्यात इतर काहीही अधिक घालण्याची जरुरी नसते परंतु मी एक दोन फरक केले - सोललेले झिंगे ( बिनसोललेल पण जगात वापरले जातात म्हणून हा खास उल्लेख) - कांदे बटाटे, लसूण मिरची चे वाटण ( केरळात यात बटाटे वापरात नसावेत, माझी बुंदेलखंडातील पाकृ आहे असे धरा हवेतर जिथे तिथे बटाटा !) - नारळाचे दूध ( नारळाचे दूध आणि क्रीम अश्या

राजयोग - २४ (उपसंहार)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २३ (अंतिम भाग) *** फकीराबरोबर असलेली ती तीन मुलं म्हणजे वेषांतर केलेल्या शुजाच्या तीन मुली होत्या. मक्केला जाण्यासाठी शुजा चट्टग्राम बंदरावर गेला मात्र वादळी पावसामुळे त्यादिवशी एकही जहाज निघाले नाही. वाटेत परत येताना, पुन्हा किल्ल्यात गोविंदमाणिक्यांची भेट झाली. काही दिवस किल्ल्यात राहिल्यानंतर सम्राटाचे सैनिक अजूनही शुजाच्या शोधात फिरत आहेत अशी बातमी आली. गोविंदमाणिक्यांनी आपले बरेच सेवक बरोबर पाठवून शुजाला त्यांचा मित्र असलेल्या आराकानच्या राजाकडे पाठवले.

राजयोग - २३ (अंतिम भाग)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २२ *** इकडे शाहशुजाला त्याचा भाऊ औरंगजेबाच्या सैन्याने सळो की पळो केले होते. इलाहाबादजवळ रणभूमीवर शेवटी त्याचा पराजय झाला. या पराभवाने अपमानित, भयभीत झालेल्या शुजाला आपले कोण आणि परके कोण यातला फरक कळेनासा झाला. वेषांतर करून तोही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लपतछपत पळू लागला. जिकडे जाईल तिकडे त्याला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शेवटी पटन्याला पोचल्यावर त्याने नवाबाचा वेष परिधान करून प्रजा आणि आपल्या परिवारासमोर येण्याची घोषणा केली.