Skip to main content

तात्याचे हाटेल

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे पटलावरचे सगळे विषय पाहीलेत का? अगदी ठरवुन सुद्धा असे होणार नाही. सगळे विषय वाचा १ काय जेवलात..... २ कोल्हापुरी मिसळ ( फसलेला अनुभव) ३ चिकन६५ स्टार्टर ४ चिकनसाग ५ पांढरा रस्सा ६ संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन) ७ खयाली पुलाव ८ संडे स्पेशल (खांडवी) ९ मांचुरियन आणि शेजवान ! १० चहा ......... .....झाले तात्याच्या हाटीलाचे मेन्युकार्ड..... हाय का नाय

चिकन ६५ - स्टार्टर

लेखक गीतांजली यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
२५० ग्राम बोनलेस चिकन बारीक़ बारीक़ तूकडे करून घ्यावे. त्यात दोन चमचे तान्दुळ पीठ, एक चमचा डाळीचे पीठ, चमचाभर तिखट, चवीपुरते मीठ, कोथिम्बिर, ओवा आणि लिम्बू पिळावा. कढीपत्याची १५/२० पाने कुरकुरीत तळून घ्यावीत. ही तळलेली पानं बारीक़ कुस्करून चिकन मधे टाकावीत. सर्वात शेवटी एक अंडे फेटून टाकावे. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा तास ठेवा. कढईत तेल गरम करायला ठेवून चिकनचा एक एक तुकडा हळू हळू तेलात सोडा व मंद आचेवर लालसर तळा. मंद आचेवर तळल्याने चिकन छान शिजते.
Taxonomy upgrade extras

ही पण "श्रीं" ची च इच्छा !

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचक, "सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे. "माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मांंई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे : ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ! आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय तुमची खूप कमतरता भासते ! तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !

चिकनसाग

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बोनलेस ब्रेस्ट पिसेस- ५०० ग्राम, पालक २,३ जुड्या,फ्रोझन पालक घेतला तर ७५० ग्राम ते १ किलो. २/३ कांदे,२/३ टोमॅटो अथवा टोमॅटोची प्युरी १/२ वाटी.
Taxonomy upgrade extras

संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन)

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
व्हेज मान्चुरीअन ची बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे मला सुद्धा ही रेसिपी द्यावीशी वाटली. साहित्यः मान्चुरीअन: १ कप कोबी,गाजर्,फ्लॉवर् बारीक चिरून १ च. बारीक चिरून हिरवी मिरची १ च.चिरून लसूण ३ टे.स्पून मैदा २ च. कॉर्नफ्लॉअर १/२ टे.स्पून तेल १/४ च. मिरपूड १/४ च. अजिनोमोटो १/४ च.व्हिनेगर १/४ च. सोयासॉस ३/४ च. मीठ वरील सर्व साहित्य एकत्र करून मान्चुरीअन तेलात तळून घेणे. ग्रेव्ही: २ टे.स्पून कॉर्नफ्लॉअर १ सपाट टे.स्पून सोयासॉस १/२ च.अजिनोमोटो २ च. साखर १ च.मीठ ३/४ च. व्हिनेगर १ सपाट च. चिलीसॉस १टे.स्पून तेल ३/४ टे.स्पून हिरवी मिरची १टे.स्पून लसूण १.च्.चिरून आलं १.
Taxonomy upgrade extras

चहा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तानो या वीकान्तासाठी रेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही. पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात्.म्हणुन येथे लिहीत आहे.( रसास्वाद ..........) ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती! आपण नेहमी ऐकत असतो की "बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणु नये" या वीकान्ता साठी चहा चे हे दोन वेगळे प्रकार्........पुरुषांसाठी आणि बायकांसाठी ही...... काहवा.... हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे.
Taxonomy upgrade extras

काय जेवलात?

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी विचित्र विषय वाटतोय ना? तर सांगायचे आहे की आज सकाळी / रात्री तुम्ही काय जेवलात. जेवण कोणी बनविले / कुठे जेवलात हे सांगायचं की नाही ही तुमची मर्जी. त्यायोगे कळेल, मिसळपावकरी पौष्टीक आहार घेतात की नाही. किंवा आपल्यालाही निरनिराळे पर्याय माहित होतील.

(मोजणी)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता मोजणी हल्ली घरात कोणा वस्तीस नेत नाही मी ही चुकून सुद्धा जोखीम घेत नाही आश्वासने जरी ती देऊन काल गेली मी खातरी तिची पण कोणास देत नाही सारे तिचे पुरावे जाळून काल आलो फसलो तरी कसा मी लक्षात येत नाही 'सत्कार' 'खास' अमुचा झाला कशा कशाने मज मोजदाद त्याची अजिबात येत नाही देहास पार अमुच्या सुजवून ठेवले की ऐन्या पुढे स्वतःला इतक्यात नेत नाही मी श्वास घेतला की मज वास येत नाही माझा सुगंध आता इथल्या हवेत नाही सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही