चिकनसाग
Taxonomy upgrade extras
बोनलेस ब्रेस्ट पिसेस- ५०० ग्राम,
पालक २,३ जुड्या,फ्रोझन पालक घेतला तर ७५० ग्राम ते १ किलो.
२/३ कांदे,२/३ टोमॅटो अथवा टोमॅटोची प्युरी १/२ वाटी. गरम मसाला
आले बोटभर, ७,८ लसूण पाकळ्या, ३,४ हिरव्या मिरच्या,मीठ,तेल,हळद,तिखट
मॅरिनेशन साठी दही १ मोठा वाडगाभर(साधारण ५०० ग्राम)
फ्रेश क्रीम १ मोठा चमचा
कृती -
चिकन चे तुकडे धुवून,साफ करून त्यावर थोड्या खाचा माराव्या.आले लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यावी.त्यातील १ मोठा चमचा पेस्ट ,१ मोठा चमचा गरम मसाला ,हळद दह्यात घालावे आणि चिकनचे तुकडे त्यात घालावे व दीड दोन तास मुरवत ठेवावे.
कांदा बारीक चिरावा किवा पेस्ट करावी,टोमॅटोची प्युरी करावी,पालकाची पानेही मिक्सरमधून काढून प्युरी बनवावी.(फ्रोझन चिरलेला पालक तसाच वापरू शकतो.मिक्सर मधून काढायची अर्थातच जरुर नाही.)
डावभर तेल गरम करून त्यात कांदा लालसर परतून घ्यावा,मग त्यात टोमॅटो प्युरी ,१ते १.५ चमचा गरम मसाला,आले लसूण मिरचीची पेस्ट १ते १.५ चमचा घालावी व परतावे, झाकण ठेवून एक वाफ आणावी,मग पालक घालून ढवळावे,थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यावे.चवीनुसार मीठ घालावे.अजून तिखट हवे असल्यास लाल तिखट चवीनुसार घालावे.
मॅरिनेटेड चिकन थोड्या तेलावर परतून घ्यावे.(शॅलोफ्राय करावे) हे तुकडे पालकाच्या भाजीत घालावे,शिजू द्यावे.मुरलेले,तळलेले तुकडे पटकन शिजतात.
नंतर थोडे फ्रेश क्रिम घालावे.
पोळी/फुलके/भाकरी/भात कशाही बरोबर गरम गरम खावे.पण तांदळाच्या भाकरीबरोबर किवा भाताबरोबर खायला जास्त मजा येते.
आमचा रोमेन नावाचा एक स्वीस मित्र ह्या चिकनवर तुटून पडतो.
वाचने
9880
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
काही खरं नाही
वा वा!
In reply to वा वा! by विसोबा खेचर
चालेल...
In reply to चालेल... by स्वाती दिनेश
:)
In reply to वा वा! by विसोबा खेचर
मी पण..
In reply to मी पण.. by प्राजु
ये..ये..
स्वाती, सोपी आहे..कृती
In reply to स्वाती, सोपी आहे..कृती by स्वाती राजेश
लिहिते..
अरे क्काय चालल॑य काय आज???
In reply to अरे क्काय चालल॑य काय आज??? by धमाल मुलगा
:))
टोमॅटोची प्युरी
टोमॅटो प्युरी
In reply to टोमॅटो प्युरी by स्वाती राजेश
वा !!!
छान आहे पाककृती .