मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन)

स्वाती राजेश · · पाककृती
Taxonomy upgrade extras
व्हेज मान्चुरीअन ची बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे मला सुद्धा ही रेसिपी द्यावीशी वाटली. साहित्यः मान्चुरीअन: १ कप कोबी,गाजर्,फ्लॉवर् बारीक चिरून १ च. बारीक चिरून हिरवी मिरची १ च.चिरून लसूण ३ टे.स्पून मैदा २ च. कॉर्नफ्लॉअर १/२ टे.स्पून तेल १/४ च. मिरपूड १/४ च. अजिनोमोटो १/४ च.व्हिनेगर १/४ च. सोयासॉस ३/४ च. मीठ वरील सर्व साहित्य एकत्र करून मान्चुरीअन तेलात तळून घेणे. ग्रेव्ही: २ टे.स्पून कॉर्नफ्लॉअर १ सपाट टे.स्पून सोयासॉस १/२ च.अजिनोमोटो २ च. साखर १ च.मीठ ३/४ च. व्हिनेगर १ सपाट च. चिलीसॉस १टे.स्पून तेल ३/४ टे.स्पून हिरवी मिरची १टे.स्पून लसूण १.च्.चिरून आलं १. ग्रेव्ही साठी प्रथम २ कप पाण्यात कॉर्नफ्लॉअर,सोयासॉस, अजिनोमोटो, साखर, मीठ्,व्हिनेगर, चिलीसॉस घालणे. २.१ टे.स्पून तेलावर, हिरवीमिरची, लसूण, आलं परतणे वरील तयार पाणी (नं.१) घालून २ मि.उकळणे. ३.मान्चुरीअन घालून २ मि. उकळणे चवीनुसार मीठ घालणे. वरून कांदापात घालून फ्राईड राईस बरोबर सर्व्ह करणे.

वाचन 9318 प्रतिक्रिया 0