आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः
C - R - U - S - H - CRUSH
ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही.
उभा मी वाटेवरती
तुझ्या डोळ्यांचे
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती
फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती
मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती
तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती
काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती
- संदीप चांदणे
काव्यरस
अशी ही भाऊबीज
अशी ही भाऊबीज
सौ सरिता सुभाष बांदेकर
सुभानराव घरात शिरले तेच हेमंतला हाक मारत.सीताबाईंनी बाहेर येत विचारलं,” अहो काय झालं? हेमंत गेलाय मॅच खेळायला, येईल थोड्या वेळात.”
“अहो थोड्या वेळात नको,सुजाताला पाठवा आणि हेमंतला म्हणावं लगेच घरी ये. मॅच राहू देत.आणि तुम्ही देवाजवळ दिवा लावा आणि देवापुढे साखर ठेवा.”
सुभानराव बाहेर गेले आणि सुजाताला हाक मारून म्हणाले,
“सुजे, पळत पळत जा आणि तुझ्या दादाला सांग ताबडतोब बोलावलंय बाबांनी.”
सुजाता तशीच धावत निघाली. ती जेव्हा मैदानात पोचली तेव्हा मॅच चालू होती.
मरण...
मरण...
रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...
तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...
कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...
आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...
कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...
झोपली नव्हती ती,
झाली होती क्लांत,
दवाखान्याच्या शय्येवर,
तिला मिळाली होती उसंत..
आकाशात दूर कुठेतरी,
तेजस्वी तारा निखळला,
गाली तिच्या एक,
चुकार
काव्यरस
बगूमामा
बगूमामा खर तर आईचा मामा आणि माझे मामाआजोबा. पण अगदी लहान वयात त्यांना आजोबा म्हणणं जीवावर यायचं. मी आईसारखचं बगूमामा म्हणायचे. यथावकाश समज आल्यावर मी आमचं नातं समजून घेऊन त्यांना आजोबा म्हणायला लागले. परवा आजोबा गेल्याच कळलं आणि डोळे भरून आले. कितीतरी आठवणी उचंबळून आल्या.
आजोबांना कोकण भारी प्रिय. इकडे यायचं म्हणजे आजोबा केव्हाही तयार. अगदी कितीतरी वर्ष आजोबा २ व्हिलर घेऊन पार्ल्यातून चिपळूणला यायचे. शेवटी आता तुम्ही २ व्हिलर वरून एवढा प्रवास करायचा नाही अशी बंदी घातली तेव्हा ते थांबले. कुठलंही काम करायला घ्या आजोबा उत्साहाने तयार. माझी आजी तर त्यांची लाडकी.
मिसळपाव
