Skip to main content

भटका कुत्रा

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 17/07/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भटका कुत्रा . पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..

बेवडे

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवली बेवडे . पिता पिता बेवडे थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच सभोवतालचा! पिता पिता बेवडे अडखळतात, मागे बघतात, कि चाचपतात. .

छोटे मोठे कवी

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनकाराचे दुखः या जालावर कुणाला कळलच नाही.. त्यांना नेहमी गावकुसाबाहेरचे अशीच वागणूक मिळाली.स्वातीताईंचे छोटे,मोठे तारे बघून आमच्यातला जखमी उपेक्षीत विडंबनकार बंड करून उठला कविवर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रतिभावान आहेस तू!! मी तुझ्याच कवितांवर जगतो. तरी.. उठून जरा सभोवार पाहा, तू ही छोटासा कवी दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त भुणभुणतो....

आदर करण्याची कदर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 16/07/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
"आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे." ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती. एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं. त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत ग

छोटे,मोठे तारे

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 16/07/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे,मोठे तारे . सुर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!! मी तुझ्याच प्रकाशात बागडतो. तरी.. इथून काही योजनांवरून पाहा, तू ही छोटासा तारा दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त मिणमिणतो.... रे तू जरा मोठा म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस. इतकंच!! तेल संपलं की वात जाळत जाळत मी विझणार. तसाच तू ही.................. मी जरा लवकर संपेन!! तू थोडा जास्त तेवशील. एवढंच!! =========================== स्वती फडणीस .............................१०-०३-२००८
Taxonomy upgrade extras

पावले

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 16/07/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
पावले . चालता चालता पावले थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच मनोबलाचा! चालता चालता पावले अडखळतात, मागे फिरतात, कि चाचपतात. . आपल्याच विश्वासाला! चालता चालता पावले शिणतात, वैतागतात, कि विचार करतात.. "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत याचा!" चालता चालता पावले चाचपतात, विचार करतात, कि पडताळून पहातात.. "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?" चालता चालता पावले थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात!!! ==================== आपली स्वाती फडणीस................1995
Taxonomy upgrade extras