कका ची बाराखडी (भारूड)
चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव...
ककाच्या नांवावर काढल्या मालीका
ककाच्या नांवावर काढल्या मालीका
काही सूरू काही संपेचना
संपेचना ठार केले नायकाला
नायीका रडते व्हीलन बधेचिना
बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे
फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना
बघेचिना त्याचा केला पुनरजनम
पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा
तरुण पुन्हा दादीचे केस काळे
डिस्को करते दादी खपेचिना
खपेचिना तिने मारल्या तीन थपडा
तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना
सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक
चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना
टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या
वाढता वाढे बाराखडी संपेचिना
वाढता वाढे ककाराचा विकार
मूर्ख बघे
Taxonomy upgrade extras
नशेचे प्रकार---अंतरीच्या नाना कळा
मी कधी दारू प्यायलो नाही परंतु, दारू पिणाऱ्याच्या अंगात नशा आणण्याच दारूत सामर्थ्य असतं हे मला ठाऊक आहे.आणि ते कळण्यासाठी दारू पिऊन पाहिली पाहिजे असं नाही.ह्या नशेत माणूस, माणूस म्हणून राहात नाही असं म्हणतात.
म्हणजे काय?
`म्हणी' मॅटर्स!
बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी.
उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं.
टॉमॅटो राईस
माझ्या अतिशय आवडीचा आहे.
घरात पुलावासाठी जर भाज्या नसतील तर हा राईस सोप्पा करायला.
साहित्यः
१) तांदुळ
२) टॉमॅटोचा रस
३) खडा मसाला
४) तुप
५) २ कांदे चिरुन
६) लसुण पाकळी वाटुन
७) लाल तिखट
९) मीठ
क्रुती:-
प्रथम तांदुळ धुवुन निथळत ठेवावे.
नंतर तुपात खडा मसाला टाकुन परतावा
त्याचा छान सा वास आला की त्यात बारीक वाटलेला लसुण टाकुन परतावे
नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा व नंतर कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात तांदुळ घालुन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतावेत. इतके की प्रत्येक तांदुळाचा दाणा व्यवस्थित मोकळा झाला पाहिजे.
नंतर त्यात टॉमॅटोचा रस व आवश्यक वाटल्यास पाणी घालावे.
अमिताभच्या "द लास्ट लियर" या चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांअभावी रद्द !!!!!
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "द लास्ट लिअर' या नव्या चित्रपटाचा "फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रेक्षकांअभावी रद्द झाला!
अधिक माहितीसाठी खालची लिंक वाचा :-
http://www.esakal.com/esakal/09132008/Specialnews00E0164861.htm
ब्रुहन्नडा
आपण सर्वजण आपआपल्या क्षेत्रात रथी,महारथी,अतिरथी असतो. किंवा तसा समज बाळगतो. माझा समज मि.पा.पैलवानानी दुर केला. बरे झाले. महारथी अर्जुनावर एक वर्ष ब्रुहन्नडा व्हायची पाळी आली होती. नव्या मिलेनियम मध्ये माझ्यावर पण हा प्रसंग आला होता.
घरात गणेशोत्सव मोठ्या आणि मिठ्या प्र्माणाने साजरा होतो. ह्या उत्सवामध्ये रसद पुरवठा आणि उष्ट्याचे निराकरण माझ्याकडे असते. स्वयंपाक प्रमुख माझी बायको(आचारी). बाकी सर्व लगतचा मोठा भाउ. सर्व काही विनातक्र्रार. ह्या पाच दिव॑सात इतर सर्व काम बंद.निखळ आनंदाचे ते पाच दिवस. विसर्जनच्या दिवशी अजुनही थोरा मोठ्यांचे डोळे पाणवतात.
निरर्थक...
एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला?
प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला?
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय...
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने..
पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला?
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी..
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू...
कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला?
वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या...
पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला?
मांडू नका समोरी पेले असे रिकामे...
भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला?
मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू...
मरतो हरेक क्षण तर...
मिसळपाव