समस्यापूर्ती
कडव्याच्या पहील्या दोन ओळीत समस्या आणि नंतरच्या दोन ओळीत पूर्ती असं लिहून पाहीलं आहे.एक प्रयोग.
जर टोचते पाठीला
जर बोचते दंडाला
खसखसूनी घासावी जर
मऊ लागते अंगाला.
***
निर्या काचती पोटाला
जीव कासावीस होई
एका धुण्यामधी कशी
खळ जाईल ग बाई.
***
असं कसं पायताण
चावे जागोजाग बाई
थेंब तेलाचा सोडावा
अंगठ्याला सैल जाई.
***
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

