समस्यापूर्ती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कडव्याच्या पहील्या दोन ओळीत समस्या आणि नंतरच्या दोन ओळीत पूर्ती असं लिहून पाहीलं आहे.एक प्रयोग.
जर टोचते पाठीला
जर बोचते दंडाला
खसखसूनी घासावी जर
मऊ लागते अंगाला.
***
निर्या काचती पोटाला
जीव कासावीस होई
एका धुण्यामधी कशी
खळ जाईल ग बाई.
***
असं कसं पायताण
चावे जागोजाग बाई
थेंब तेलाचा सोडावा
अंगठ्याला सैल जाई.
***
वाचने
3494
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रयोग छान आहे..
सुंदर...
समस्या आणि त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न
चुकत असेल तर सांगा
जोरात