Skip to main content

ते आणि आम्ही

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 16/09/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
फुले अशी उमलत असताना मधुरसाच्या अपेक्षेने जवळच होते भुंगे दबा धरून... थेंब दवाचे झेलत अंगावर चुरचुरणा-या थंडीत आम्हीही होतो पलिकडेच डबा धरून रेल्वे अशी धावत असताना खिडकीच्या अपेक्षेने जो तो धक्का देत आपापली जागा धरून... आघात त्यांचे झेलत अंगावर गुदमरणा-या गर्दीत आम्ही होतो लोंबकळत डबा धरून देश असा प्रगती करीत असताना देणग्यांच्या अपेक्षेने तिजो-या भरताहेत सर्वांच्या भरभरून... उपहास नि उपेक्षा झेलत अंगावर सत्कार्याच्या अपेक्षेने अजुनही आम्ही आहोत डबा धरून
लेखनविषय:

वाचने 1411
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

दाद देण्याच्या भावनेने आम्हीही आलो आहोत निबा पकडून (निब.. निफ... इतीहासजमा झालेले लेखनयंत्र.)