आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले,
"हे गंगाधर अधिकारी,गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे.
आमच्या शेजार्यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो."
त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं.
पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्यावर किंचीतसं स्मित