Skip to main content

सत्यमच्या निमित्याने

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 10/01/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक मर्यादित कंपनी जेवढा नफा कमावते त्याच्या प्रमाणात तिला कर भरावा लागतो आणि तिचे सममूल्यधारक उरलेल्या संपत्तीचे वाटेकरी बनतात. सरकार आणि सममूल्यधारक यांना त्यांचा न्याय्य वाटा द्यावा लागू नये या उद्देशाने कांही स्वार्थी संचालक हिशोबाच्या वहीत लिहिलेल्या आकडेवारीत कंपनीला झालेला नफा कमी दिसेल अशी तरतूद करून नफ्याचा कांही भाग स्वत:च्या घशात घालतात असे यापूर्वी ऐकले होते. पण या राजू महाशयांनी याच्या विपरीत जाऊन कंपनीला न झालेला फायदा झाला असे दाखवले असे दिसते. न झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला ? अखेर तसे केल्याने त्यांनी काय साध्य केले असेल?

जिवासवे जन्मे मृत्यू

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 10/01/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले. अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला. इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले.

मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.

लेखक रेझर रेमॉन यांनी शनिवार, 10/01/2009 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यम चा घोटाळा... ८५ % फ्री - फॉल. सेन्सेक्स गोईंग स्टीपर डाऊन... म्युच्युअल फंडस् किरकोळीत गेलेले... मराठी माणसाचा टक्का बाजारात जरा कुठे दिसतोय न दिसतोय तोवर एक महाघोटाळा होतोच... मग आपण बाजारातून पळून जाणार का? शेअर्स चे भाव गडगडतात हे आपलं लाडकं मत... धोका आहेच... ब्लू चिप.. मेगा-जायंट कॉर्पोरेट अशी चालवली जाते तर विश्वास कुणावर ठेवायचा? असे धोके आपल्याला बाजारा पासून दूर नेतील का? सत्यम् च्या धक्क्याचा तुमच्या आर्थिक धोरणावर बदल झाला का? आणि कसा? नसल्यास का झाला नाही? बिट कन्फ्युज बावत ऑल. -रेझर

मराठी विकी किती उपयोगी वाटतो ??

लेखक अभिरत भिरभि-या यांनी शुक्रवार, 09/01/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकी ज्ञानकोश किती काल सुसंगत वाटतो ? विकी हा मराठी मधील मुक्त ज्ञानकोश आहे हे इथल्या सर्वांआ माहिती असेलच. सध्या मराठी विकीवर सुमारे २२ हजार लेख आहेत. भारतीय विकींमध्ये मराठी सध्या ४ थ्या स्थानावर आहे. व २ / ३ स्थानावरील भाषांपेक्षा मराठी फ़ार मागे नाही.

लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 09/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे. आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :) या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का?

नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 09/01/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो. कोणी लिहिले नाही तर मी लिहिन

श्री ट्रॅफीक दुर्दैवाचे दशावतार

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 09/01/2009 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज ट्रॅफीक मध्ये अडकलो. त्यामुळे उद्वेगान असल काहीतरी लिहून काढल . १) ट्रॅफीक जाम अवतार : आपल्याला कुठेतरी वेळेत पोहोचायच असत. नेमका तेव्हाच हा अवतार प्रकट होतो. आणि तुम्ही बाजूच्या खिडकीतले रडणारे/ केकाट्णारे पोर (जर मुंबईकर असाल तर) नायतर शेजारच्या स्कुटी/ कायनेटीक वरची बुरखाधारी व्यक्ती (जर पुणेकर असाल तर ) न्याहा़ळत बसता. . २) सिग्नल डाऊन अवतार : आपण सिग्नलपाशी क्रॉसींगला आलो रे आलो की सिग्नल पडतो (पडतो म्हणजे जागच्याजागीच लाल होतो) .

अतिंद्रिय शक्ती

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 09/01/2009 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का? माझा आहे. माझ्या आईला अतिंद्रिय शक्ती होती. मी सहावीत होतो. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्याची बातमी सकाळी घरी आली. फोन नव्हाता घरी. वहिनीने उत्साहाने तयार करुन ठेवलेली दुपट्याची पिशवी काढली. आईच्या हातात सुपुर्द केली. घरातुन बाहेर पडताना ती पिशवी आईने बरोबर न घेतल्याचे बघुन वहिनीने ती पिशवी माझ्या हातात दिली. " त्या पिशवी चा आता काही एक उपयोग नाही" असे म्हणुन आईने पिशवी मला परत ठेवायला लावली. हाताने इशारा करुन वहिनीला गप्प बसायला सांगितले. मला तेंव्हा हा प्रकार नेमका काय ते कळाले नाही. पण दादरला हॉस्पिटल मधे गेल्यावर उलगडा झाला.