Skip to main content

काही ग्राफिटीज्

लेखक राज-निती यांनी सोमवार, 23/02/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'. कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही, तेव्हां जास्तच संशय येतो. 'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.

लाल फितीचा कारभार.

लेखक यांनी सोमवार, 23/02/2009 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी २००८. प्रजासत्ताक दिनी कॅप्टन सुनील चौधरी यांना सेना पदक (शौर्य) देण्यात आले.आसामच्या तिनसुखीया जिल्ह्यातील उल्फा दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीचा सन्मान सेना पदक देऊन करण्यात आला. दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. २७ जानेवारी २००८ रोजी गुप्तचरांकडून पक्की खबर मिळाली की रंगगढ नावाच्या खेड्यात ७-८ उल्फा दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. कॅप्टन चौधरी लगेचच आपल्या सहकार्‍यांबरोबर त्या खेड्याकडे रवाना झाले. ज्या घरामधे दहशतवादी लपले होते त्या घराभोवती वेढा घालायला त्यांनी सुरूवात केली.

ओढ

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 23/02/2009 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
सरते पुढे, अडते, फिरते तुज पाहता, पाऊल हे ओसंडते डोळ्यातूनी हिंदकळते ह्रदयात जे मी लाख थांबवी तरी वळते नजर, झुकते नजर अन लाज बोलते मला भिडवू नको, नजरेस गे.... किती करावी याचना वेड्या मना तुझी रे मी वागू नको, असा.. तसा.. , आवर मना, आवर हे.... चाहुल ती येता जरा अडखळते मीच चालता वर भास हे झुलवी मला सावरशील, सावर रे.... अता छतावरी किती मी कोरली स्वप्ने नवी अजाणता झाले तुझी तुज आळवी, सत्यात ये....
Taxonomy upgrade extras

फलज्योतिषाच्या मर्यादा

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 23/02/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रकाश घाटपांडे यांची पत्रिका आणि विवाहेच्छू या विषयावरची मालिका चालू आहे. त्यात प्रामुख्याने ज्योतिषशास्त्राच्या मूळच्या फोलपणाविषयी विवेचन आहे. मी एका वेगळ्या दृष्टीने ज्योतिषविषयक विचार मांडले आहेत. आधुनिक विद्येने विभूषित असलेले (पण जुन्या परंपरांविषयी प्रेम सुटत नाही असे) अनेक लोक ज्योतिषाचे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या आधारे समर्थन करू इच्छितात किंवा पत्रिका म्हणजे जनुकीय नकाशा असे गृहीतक मांडतात.

"अबीर" बद्दल काही....

लेखक असिम यांनी सोमवार, 23/02/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
"अबीर गुलाल उधळीत रंग... नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग" "अबीर" या शब्दाचा नेमका अर्थ काय? व्युत्पत्ती बद्दल कुणी माहिती पुरवू शकेल का? -असिम

श्रद्धांजली - व्हराडकार डॉ लक्ष्मणराव देशपांडे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 23/02/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत. मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...! -- तात्या अभ्यंकर.

राजमा

लेखक मिथिला यांनी सोमवार, 23/02/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
सहित्य - राजमा १ वाटी (कॅन असतील तर १५ oz चे २ ) २ लहान कांदे - बारिक चिरलेले १ टोमॅटो- बारिक चिरलेला १ चमचा धने-जीरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला १ चमचा तिखट १ चमचा आल-लसूण पेस्ट पाउण वाटी आंबट दही चवीनुसार मीठ २ मोठे चमचे तेल बारीक कापलेली कोथिंबीर फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, १) राजमा अधल्या दिवशी भिजत घालावा (कॅन असतील तर ही स्टेप टाळावी हे सांगण्याची गरज नाही) २) राजमा दु प्पट पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा ३) कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, जिरे घालावे ४) बारिक चिरलेला कांदा फोडणीत टाकावा, गुलाबी होईस्तोवर परतावा, आल-लसूण पेस्ट,

जय हो... पण कुणाचा?

लेखक किरण जोशी यांनी सोमवार, 23/02/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
'स्लमडॉग मिलिनियरला' या चित्रपटाला ऑस्कर मिळाला आणि भारतात एकच जयजयकार सुरू झाला. बॉलीवूडच्या लाडक्या ए. आर. रहमान यांनाही ऑस्कर मिळाला. पण, भारतीय मनावर अधिराज्य गाजवणा-या रहमान यांना त्यांच्या चाहत्यांनी कधीच 'ऑस्कर' दिला आहे. 'स्लमडॉग' बाबत बोलायचे झाल्यास विदेशी निर्माता-दिग्दर्शकाने भारतातील गरिबीचे भांडवल करून या चित्रपटाची निर्मिती केली. आणि केवळ विदेशी असल्यामुळेच या चित्रपटाची ऑस्करमध्ये 'हवा' झाली. यापूर्वी भारतातील निर्माता-दिग्दर्शकांनीही याच विषयावर दर्जेदार चित्रपट निर्मिती केली आहे. पण, त्यांना ऑस्कर सोडाच साधा पुरस्कारही मिळालेला नाही.

रेहमान आणि गुलजार -- जय हो !

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 23/02/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
हार्दिक अभिनंदन रेहमान !!! सत्यजीत रे, भानु अथैया यानंतरचे भारतीय ऑस्कर विजेते :) ए. आर. रेहमान -- संगीत गुलजार / रेहमान -- गीत / संगीत चित्रपट -- स्लमडॉग मिलियनीअर !!! (अभिमानी भारतीय) संदीप

तहान

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
हं... इथे खण.... खणत रहा ...हा भूतकाळ आहे .... तो तुला खणायचाय... खणताना निघतील अवशेष आठवणिन्चे... यशाचे .. चुकांचे... हवेसे... नकोसे लक्षात ठेव, .... अवशेषामधे मन गुंतवायचं नसतं.....! पुढे लागतील थडगी, सोडून गेलेल्या आप्तांची... दगलबाज मित्रांची, लक्षात ठेव, ... थडग्यांपुढे फुलेच ठेवायची..... मन नाही ! खण .... खणत रहा ...... खणता खणता संपेल सारं .. थकून पाहशील अवती भवती .. .... तहानलायस ..! उतर .. या खोल भूतकाळाच्या गाभा-यात .. शोध मूळ जाणीवेचा निर्मळ झरा.. आता या झ-यालाच वर्तमानकाळ बनव अन् पडून रहा, ... या झ-याकाठी .. निपचित ...! -- सागरलहरी
Taxonomy upgrade extras