Skip to main content

आणखी एक कविता पूर्ण करा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 02/04/2009 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता. बघा ब्वॉ रिपेअर करता येते का .. रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले |
Taxonomy upgrade extras

लतादीदीस सप्रेम.........

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/04/2009 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे गाणे तुझे नाही तुझे असणे तुझे नाही ते किंचित हंसणे तुझे नाही.. तो गंधार, तो मल्हार असतील ते सुर तुझे, पण त्याचे वेड तुझे नाही ! तुझ्या ओठीचा शब्द तुझ्या गळ्याचे सुर व्यसन कोकीळे ते तुझे नाही ! तुझ्या सुरातली तंद्री तुझ्या स्वरातली धुंदी ते धुंदावणे तुझे नाही ! तानपुर्‍याची मधुर तान किंचित लवणारी सुरेल मान ते वेडावणे तुझे नाही ! तुझे सुर श्वासात भिनलेले त्या स्वरांसह श्वासांची गती वाढणे तुझे नाही! तो हक्क आम्हा रसिकांचा तुझ्या गळ्याच्या गुलामाचा ते भाग्य कोकिळे तुझे नाही स्वरकोकिळा मा. लतादीदींच्या एका वाढदिवशी ही कविता केली होती. विशाल

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.

लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग २)

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/04/2009 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १) स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर. वेळ ः दुपारी चारची. पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री. ----------- पार्श्‍वभूमी ः कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्‍नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल.

(डास)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 01/04/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

शुन्य साखरे ची पौष्टिक खजुर बर्फी

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 01/04/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी खजुर १/२ वाटी काळ्या मनुका ३/४ वाटी काजु + बदाम + पिस्ता पूड १-२ छोटा चमचे तुप २-३ वेलची पूड २ चमचे खसखस सजावटी साठी अख्खे काजु..... कृति: १) खजुर बारिक चिरुन यंत्रा वर जाडसर वाटून घ्या. २) मनुका हि यंत्रा वर जाडसर वाटून घ्या. ३) काजु + बदाम + पिस्ता ची बारिक पूड करुन घ्या. ४) एका ताटात जाडसर वाट्लेले खजुर+मनुका+(काजु + बदाम + पिस्ता) पूड+वेलची पूड+तुप+ खसखस एकत्र करुन घ्या. ५) हे मिश्रण छान मळुन घ्या. ६) हव्या त्या आकारा त बर्फि करून घ्या. ७) काजु लावून सजवा. ८) लगेच एक

थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 01/04/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
थोरांची ओळख जालिंदर जलालाबादी : या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला. त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.

दास

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 01/04/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.

कविता पूर्ण करा...

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे. ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी. या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? - प्राजु