लेखकदिपाली पाटिलयांनी बुधवार, 01/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:
१ वाटी खजुर
१/२ वाटी काळ्या मनुका
३/४ वाटी काजु + बदाम + पिस्ता पूड
१-२ छोटा चमचे तुप
२-३ वेलची पूड
२ चमचे खसखस
सजावटी साठी अख्खे काजु.....
कृति:
१) खजुर बारिक चिरुन यंत्रा वर जाडसर वाटून घ्या.
२) मनुका हि यंत्रा वर जाडसर वाटून घ्या.
३) काजु + बदाम + पिस्ता ची बारिक पूड करुन घ्या.
४) एका ताटात जाडसर वाट्लेले खजुर+मनुका+(काजु + बदाम + पिस्ता) पूड+वेलची पूड+तुप+ खसखस एकत्र करुन घ्या.
५) हे मिश्रण छान मळुन घ्या.
६) हव्या त्या आकारा त बर्फि करून घ्या.
७) काजु लावून सजवा.
८) लगेच एक बर्फि तोंडात टाका.
या बर्फि त गोडवा खजुर आणि मनुका तुन येतो पण अजुन गोड हवे असल्यास अंजीर वा साखर घालावी नहितर सुका मेव्या चे प्रमाण कमीजास्त करता येते.
यातुन खुप लोह मिळते.
चवी ला खुप छान लागते.
वॉव.. मस्तच !! घरात चिक्कार खजुर पडलाय , त्यामुळे नक्कीच करणार..
मी सोपे आणि पटकन होणारे दाणे खजुराचे लाडू करते.. काय लागतात!! आहा!! :)
ही बर्फी सुद्धा सही लागेल चवीला!
क्या बात है !
सर्व भगीनी मंडळच येथे प्रतिसाद देण्यासाठी जमा झालेले आहे =))
* पाककृती छान आहे, पण आमच्या कडे कोणी नाही आहे करुन भरवणारे ;) त्यामुळे फोटोवर समाधान.
खाल्ली होती ही बर्फी..... मस्त असते एकदम.
पौष्टिक असते आणि शून्य साखर असते हे माहिती होते पण 'कॅलरीज' ही भानगड किती प्रमाणात असते याची काही माहिती देऊ शकशील का?
भरपूर कॅलरीज संदीप! खजूर, मनुका (पक्षी: द्राक्ष) यांच्यात भरपूर शर्करा असते आणि काजू आहेतच वर!! :-)
पण मला आवडेल खायला, कोणी बनवून देणार असेल तर! दोन फेर्या जास्त मारेन ...
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
अशी बर्फी खाल्ली आहे मस्त लागते,,,आज काल शुगर फ्री मिठाई घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.
(अंजीर बर्फी प्रेमी)
मदनबाण.....मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...
प्रतिक्रिया
वॉव.. मस्तच
करायला हवी.
बेस्ट!!!
मस्तच.
काय मस्त
फारच छान
सही!!
क्या बात
मस्त..
गोड!
आमच्या एका मित्राकडे
भरपूर
In reply to आमच्या एका मित्राकडे by संदीप चित्रे
धन्स अदिती
In reply to भरपूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा!
अशी बर्फी