Skip to main content

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 05/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

१५०० अब्ज डॉलर !

लेखक दशानन यांनी रविवार, 05/04/2009 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीने अमेरिकेचा गळा काय आवळला, अमेरिका एकदम जमीनीवर आली, आपल्या पैशाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ओबामा ने अनेक पाऊले उचलायला सुरवात केली व त्याच बरोबर भारतात सार्वजनिक निवडणूकीचे वारे वाहू लागले होते, व ओबामाला एक महत्वाचा मुद्दा कळाला जो मुद्दा भारतात राजीव गांधीच्या बोफोर्स लफड्यापासून शेबंड्या पो-याला ही माहीत आहे तो म्हणजे स्वीस बॅंकेतील काळा पैसा ! मंदीवरील एक उपाय म्हणून ओबामाने स्विस बैंकेमध्ये असलेल्या अमेरिकन खात्यांची माहीती मागवण्याची चाल खेळली, थोडासा दबाव टाकून स्विजरलैंड ला मजबूर केले की लिस्ट जाहीर करण्यासाठी.

स्टफ मेथी पराठे

लेखक chikusi यांनी रविवार, 05/04/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : 1 मेथीची जुडी, डाळीच पीठ, फोडणीचे साहित्य, कणीक, मीठ, तिखट, 7-8 लसूण पाकळ्य कृती : मेथीची जुडी धुवून व बारीक चिरून घ्या. तेल तापवत ठेऊन त्यात मोहरी ठेचलेला लसूण, हिंग, हळद, मेथी, मीठ, तिखट घाला. भाजी परतून कोरडी झाल्यावर त्यात डाळीचे पीठ घाला. भाजी थोडी शिजवा, थंड करा. 10-12 मध्यम आकारच्या पोळ्यांसठी लागणारी कणीक, मीठ व मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर दोन पुर्‍या लाटून एका पुरीवर मेथीची भाजी घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन घट्ट दाबून घ्या. हलक्या हाताने पीठ लाऊन प्रते लाटा. दही, चटणी, तूप, लोणी बरोबर पराठे खाण्यास द्या.

रॅगिंग !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 05/04/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
शासनाने कडक नियम करूनसुद्धा रॅगिंगने नुकतेच पुन्हा काही बळी मिळवले आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माझ्याही रॅगिंगविषयी काही आठवणी जाग्या झाल्या. अर्थातच आता सगळेच हास्यास्पद वाटते, वाटतं की तेंव्हा उगीचंच आपण इतके घाबरलो, पण फर्स्ट इयरला 'सिनियर' म्हटले की पोटात गोळा उभा राह्यचा. त्यातून फायनलमधल्या एका किडकिडीत सरदारजीचा दरारा खूपच होता. सगळे हॉस्टेलाइट्स चळचळ कापत असत. तो मध्यरात्री सगळ्यांना फक्त बनियन-चड्डीवर भर पुणे-बंगळूर हायवेवर नेत असे व एखादी बस जवळून पास झाली की सगळ्यांना कोरसमध्ये 'हम सब चूत्ये हैं ! अशी गर्जना करायला लावीत असे.

खजुराचे सरबत

लेखक chikusi यांनी रविवार, 05/04/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
विभाग : पेय किती जणांसाठी : १ एकुण लागणारा वेळ : खज़ुर भिजायला ३ तास, नंतर ५ मीनीटे. साहित्य : ७/८ बीया खज़ुर, ८/१० मनुका. कृती : खज़ुर व मनुका स्वच्छ धुवुन घ्या. स्वच्छ पाण्य़ात भीजत घाला. ३ तास भीजल्यानंतर हाताने सोलून घ्या किंवा मीक्सरमधून फीरवून घ्या. गाळून प्यायला द्या. टिप : हे एक स्फुर्ती पेय आहे दक्षता : मीक्सरमधून फीरवतना प्रथम खज़ुरातील व मनुकांमधील बीया काढून टाका.

'आंबे' त्वा निर्मीयले कवतुके....

लेखक उदय ४२ यांनी शनिवार, 04/04/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत समयी फुले ,परिमळे दिशा व्यापि जो, जयास अवलोकुनी सुरतरुही चित्ती थिजो तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती परिपिकची एकला मधुर वाणि लाधे कृती. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच हे कवन .त्याचा लहानपणी कधी अर्थ कळला नाही , आताही धड माहीती आहे ,असे ठामपणे सांगता येणार नाही.पृथ्वी वृत्ताचं उदाहरण म्हणून तोंडपाठ करून ठेवलेल्या चार ओळी या पलीकडे माझी दृष्टी कधी गेलीच नाही.' 'परिमल ', 'चित्ती थिजो ' 'मधुर 'वगैरे शब्द (शिवाय धडधडीत पुरावा म्हणून ) आम्रवृक्ष असा उल्लेख यावरून आंबे खाण्याशी याचा काही संबध असावा असं माझ्या बालबुध्दीला वाटत असे (हे पिक म्हणजे कोकीळेला उद्देशून रचलेलं कवन आहे असं पुढे कोणीतरी स

तुझे माझे नाते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 04/04/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी
Taxonomy upgrade extras